वऱ्हाडी म्हणून आल्या अन् चार लाखांचे दागिने घेऊन गेल्या

By रोशन मोरे | Published: November 29, 2023 04:35 PM2023-11-29T16:35:19+5:302023-11-29T16:35:44+5:30

चोरी करणाऱ्या महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत

They came as bridegrooms and took jewelery worth four lakhs | वऱ्हाडी म्हणून आल्या अन् चार लाखांचे दागिने घेऊन गेल्या

वऱ्हाडी म्हणून आल्या अन् चार लाखांचे दागिने घेऊन गेल्या

पिंपरी : तुळशीच्या लग्नानंतरलग्नसराईला सुरुवात झाली आहे. मात्र, लग्न समारंभामध्ये वऱ्हाडी म्हणून आलेल्यांकडून दागिन्यांच्या चोरी केली जात असल्याची घटना दिघी येथे उघडकीस आली होती. या घटनेच्या अवघ्या चार दिवसांत पुन्हा रावेत येथे लग्न समारंभामध्ये आलेल्या दोन महिलांनी नवरदेवाच्या चुलतीचे चार लाखांचे दागिने चोरले. चोरी करणाऱ्या महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. ही घटना सोमवारी (दि.२७) किवळेतील एमडीएस बँक्वेट हॉल येथे घडली. या प्रकरणी महिलेने रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या आपल्या पुतण्याच्या लग्नसोहळ्यासाठी किवळेतील एमडीएस बँक्वेट हॉल येथे उपस्थित होत्या. त्यांच्या पर्समध्ये असलेल्या दोन लाख ५० हजाराच्या कानातील सात लहान हिऱ्याचे खडे असलेल्या कुड्या, दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे मणी, हार असे चार लाख रुपयांचे दागिने पर्समध्ये ठेवले होते. वऱ्हाडी म्हणून आलेल्या दोन महिलांनी या पर्समधील दागिने चोरून नेले. या महिलांचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: They came as bridegrooms and took jewelery worth four lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.