‘टेडीबेअर’मुळे खळबळ; बॉम्ब शोधक पथकाची धाव अन् सोडला सुटकेचा निश्वास  

By विश्वास मोरे | Updated: May 15, 2026 23:33 IST2026-05-15T23:33:02+5:302026-05-15T23:33:46+5:30

डॉ. डी. वाय पाटील रुग्णालय मुलींच्या वसतिगृहाजवळ संशयास्पद वस्तू आढळल्याची माहिती 

teddy bear causes a stir in pimpri bomb squad rushes in and breathe a sigh of relief | ‘टेडीबेअर’मुळे खळबळ; बॉम्ब शोधक पथकाची धाव अन् सोडला सुटकेचा निश्वास  

‘टेडीबेअर’मुळे खळबळ; बॉम्ब शोधक पथकाची धाव अन् सोडला सुटकेचा निश्वास  

विश्वास मोरे,  लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : संत तुकारामनगर पोलीस ठाण्याला शुक्रवारी  (दि १५) रात्री सव्वा आठच्या सुमारास डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय परिसरातील मुलींच्या वसतिगृहाजवळ एक संशयास्पद बॉक्स असल्याचा फोन आला. त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तातडीने तपासणी केली. तपासणीत बॉक्समध्ये ‘टेडीवेअर’ असल्याचे आढळले. बॉम्बची अफवा असल्याचे आढळल्याने सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला. 

संत तुकारामनगरमध्ये डॉ. डी. वाय पाटील रुग्णालय आणि वैदकीय महाविद्यालय आहे. त्यात  मागील बाजूस मुलींचे वसतीगृह आहे.  त्याठिकाणी एक बॉक्स पडला आहे, असा दूरध्वनी पोलिसांना रात्री सव्वा आठच्या सुमारास दूरध्वनी आला आणि पोलिस दलात खळबळ उडाली.  या माहितीमुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तातडीने दहा ते पंधरा मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा ताफाही आला. त्यामुळे बघ्याची गर्दीही जमली होती.   

अशी केली तपासणी  

घटनास्थळी पोलिसांची हालचाल वाढल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. रुग्णालय परिसर तसेच वसतिगृहाजवळ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यावेळी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी परिसराची पाहणी करत नागरिकांना सुरक्षित अंतरावर थांबवले. सुरक्षा कवच निर्माण केले. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने संशयास्पद वस्तूची बारकाईने तपासणी केली. सुमारे अर्धा तास सुरू होती. पोलिसांनी सुरूवातीला बॉक्स उघडला. तर त्यात एक टेडीवेअर होता. त्यास बॉक्समधून बाहेर काढून तपासणी केली. संशयास्पद अथवा स्फोटक वस्तू नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिस आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

परिसरात मोठी गर्दी झाली 

या घटनेमुळे साडेआठ ते रात्री पावणे दहापर्यंत परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे सांगितले आहे.

डॉ. डी. वाय पाटील रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय मुलींचे वसतीगृहाजवळ एक बॉक्स पडला आहे, असा दूरध्वनी आला. तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संशयित वस्तूची तपासणी केली. त्यावेळी बॉक्समध्ये  ‘टेडीवेअर’ असल्याचे आढळले. ही भेटवस्तु तेथील विद्यार्थिनींची असल्याचे चौकशीत आढळून आले.   -सुहास आव्हाड, पोलिस निरीक्षक 

Web Title : टेडी बियर से दहशत: बम निरोधक दस्ते को बुलाया, झूठी अलार्म के बाद राहत

Web Summary : पिंपरी में एक गर्ल्स हॉस्टल के पास संदिग्ध बॉक्स मिलने से बम की दहशत फैल गई। बम निरोधक दस्ते को टेडी बियर मिला। झूठा अलार्म होने से सभी ने राहत की सांस ली। पुलिस ने जनता से संदिग्ध वस्तुओं की सूचना देने का आग्रह किया।

Web Title : Teddy Bear Scare: Bomb Squad Called, Relief After False Alarm

Web Summary : A suspicious box near a girls' hostel triggered a bomb scare in Pimpri. Bomb disposal squad found a teddy bear inside. It was a false alarm, bringing relief to everyone. Police urged public to report suspicious items.