वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फोन करून महिलेचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 13:14 IST2020-01-23T13:13:47+5:302020-01-23T13:14:54+5:30

अज्ञात माेबाईल धारकाने महिलेला वेगवेगळ्या माेबाईल क्रमांकावरुन फाेन करुन विनयभंग केला.

sexual harassment of women by calling from different mobile numbers | वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फोन करून महिलेचा विनयभंग

वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फोन करून महिलेचा विनयभंग

पिंपरी : वेगवेगळ्या नऊ मोबाइल क्रमांकावरून फोन करून महिलेशी अश्लील बोलून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. २१) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकाच्या विरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ते २० जानेवारी दरम्यान अज्ञात आरोपीने वेगवेगळ्या नऊ मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी महिलेस वारंवार फोन केला. फोनवरून अश्लील बोलून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: sexual harassment of women by calling from different mobile numbers