राम जन्मभूमी-बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांचा रूटमार्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 04:40 PM2019-11-06T16:40:56+5:302019-11-06T16:41:57+5:30

पिंपरी-चिंचवड सायबर सेलने सोशल मीडियावरील वादग्रस्त हालचालींवर लक्ष ठेवले आहे.

Rootmarch of Wakad police on the backdrop of Ram Janmabhoomi-Babri Masjid result | राम जन्मभूमी-बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांचा रूटमार्च

राम जन्मभूमी-बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांचा रूटमार्च

Next

पिंपरी : राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ५) वाकड परिसरात पोलिसांनी रूटमार्च केला.
  वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडीमधील पाचपीर चौक, नढेनगर, भारतमाता चौक, काळेवाडी मेन रोड, थेरगाव मधील सोळा नंबर, पडवळनगर या भागात रूटमार्च करण्यात आला. यामध्ये एक सहाय्यक पोलीस आयुक्त, दोन पोलीस निरीक्षक, ११ सहाय्यक पोलीस निरीक्षक-उपनिरीक्षक, ६० पोलीस कर्मचारी, २० राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते. 
  राम जन्मभूमी - बाबरी मशीद प्रकरणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. न्यायालय याबाबत जो निर्णय देणार आहे, त्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाने आदर करायला हवा. या निकालानंतर या प्रकरणावर समाजात, सोशल माध्यमांवर टीका-टिपण्णी अथवा धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड सायबर सेलने सोशल मीडियावरील वादग्रस्त हालचालींवर लक्ष ठेवले आहे.
 निकालानंतर न्यायालयाचा अवमान करणाºया तसेच सोशल मीडियावर समाजविघातक पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Rootmarch of Wakad police on the backdrop of Ram Janmabhoomi-Babri Masjid result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.