शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा निकाल ९४.७७ टक्के

By admin | Updated: June 9, 2015 05:45 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा शहराचा एकूण निकाल ९४.७७ टक्के लागला.

पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा शहराचा एकूण निकाल ९४.७७ टक्के लागला. एकूण १७ हजार ४४ पैकी १६ हजार १५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण १६१ पैकी ६१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एकला आॅनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. शहरातून १६ हजार ३७६ विद्यार्थ्यांनी मार्च महिन्यात झालेली दहावीची परीक्षा दिली. नियमित १६ हजार ३७६ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ८७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ८,३९३ मुले व ७,४८१ मुली उत्तीर्ण झाले. पुनपरिक्षार्थी ६६८ पैकी २७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरातील एकूण ६१ शाळाचा निकाल १०० टक्के लागला. त्यातील ३ शाळा महापालिकेचा आहेत. मावळ तालुक्यातील एकूण ४ हजार ७१४ पैकी ४ हजार ६०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी २ हजार ३७५ मुले व २ हजार ३२५ मुली उत्तीर्ण झाल्या. महापालिका शाळा निकालात घटमहापालिकेच्या फुगेवाडी, केशवनगर आणि क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाचे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे, तर एकूण १८ शाळांचा निकाल ९१.२५ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण निकालात २ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी ९३.३८ टक्के निकाल लागला होता. भोसरी, कासारवाडी, पिंपरीगाव, लांडेवाडी, वाकड, आकुर्डी, निगडी या शाळांचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. यंदा तीन शाळांतील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी केवळ क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाचा निकाल १०० टक्के होता. यंदा ही संख्या तीनवर पोहचली आहे. महापालिका शाळेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. भोसरी विद्यालय : ९१.७ टक्के, संत तुकारामनगर विद्यालय : ९२.६८, कासारवाडी विद्यालय : ९१.५२, फुगेवाडी विद्यालय : १००, खराळवाडी विद्यालय : ९३.५८, नेहरुनगर : ८८.४०, पिंपरी गाव विद्यालय : ६६.६, काळभोरनगर विद्यालय : ९१.५३, लांडेवाडी विद्यालय : ८६.८८, क्रीडा प्रबोधिनी विद्यालय : १००,पिंपळे सौदागर विद्यालय : ९०.५०,पिंपळे गुरव विद्यालय : ९५.८५, वाकड विद्यालय : ७६.८, थेरगाव विद्यालय : ९५.९३, केशवनगर विद्यालय : १००, आकुर्डी विद्यालय : ९४.२, निगडी विद्यालय : ८९.६, रुपीनगर विद्यालय : ९७.३२.(प्रतिनिधी)