पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 15:44 IST2021-08-27T15:44:17+5:302021-08-27T15:44:26+5:30
तीनचाकी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल

पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी
पिंपरी : तीनचाकी टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. भोसरी येथील पेट्रोलपंपासमोर पुणे-नाशिक हायवेवर गुरुवारी हा अपघात झाला.
सौरभ बाळू जोशी (वय २०) असे अपघातातमृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर, मोहन खिरू चव्हाण (वय ३७, रा. सद्गुरूनगर, भोसरी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीनचाकी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ आणि मोहन दुचाकीवरून भोसरी येथील पेट्रोलपंपासमोरून चालले होते. त्या वेळी भरधाव वेगात येणाऱ्या तीनचाकी टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने सौरभचा मृत्यू झाला. त्यानंतर टेम्पोचालक अपघाताची माहिती न देता व जखमींना उपचार न करता परस्पर निघून गेला.