शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी शहरात मेट्रो आली; पण सहापैकी केवळ दोनच स्थानकांवर फिडर बसची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:46 IST

- प्रवाशांचा प्रवास खडतर : उद्योगनगरीत ‘कनेक्टिव्हिटी’चा प्रश्न गंभीर; घरापासून स्थानकापर्यंत आणि परत घरापर्यंत जायचे कसे?; रिक्षा आणि कॅबच्या अवाच्या सव्वा भाड्याने नागरिक हैराण

रवींद्र जगधने
 
पिंपरी : मेट्रोमुळे उद्योगनगरीतील प्रवाशांचा प्रवास सुखद झाला असला, तरी ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’चा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. शहरातील सहा प्रमुख स्थानकांपैकी केवळ पीसीएमसी आणि नाशिक फाटा येथेच फिडर बसची तोकडी सेवा उपलब्ध आहे. परिणामी, मेट्रोचे ३० रुपयांचे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्थानकापासून घरापर्यंत जाण्यासाठी रिक्षाला १०० ते ३५० रुपये मोजावे लागत आहेत.

फिडर बसच्या अभावामुळे प्रवाशांची लूट होत आहे. पिंपरी-चिंचवडमधून मेट्रोला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज हजारो प्रवासी पीसीएमसी स्थानकापासून पुण्यातील विविध मार्गावर प्रवास करतात. मात्र, घरापासून स्थानकापर्यंत आणि परत या मार्गावर वाहतूक नसल्याने मेट्रोच्या प्रवासी संख्येत अपेक्षित वाढ होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
 
कनेक्टिव्हिटी केवळ कागदावरच ?

शहरात मेट्रो मार्गावर पीसीएमसी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी ही स्थानके आहेत. मात्र, काळेवाडी फाटा फिडरसाठी केवळ चार बस कार्यरत आहेत. पीसीएमसी स्थानकावरून पूर्वी मुकाई चौक आणि रावेतसाठी असलेली बससेवा आता वाल्हेकरवाडीपर्यंत मर्यादित केल्याने रावेत-किवळेकरांची कोंडी झाली आहे. तेथे बसची वारंवारिता कमी आहे, तेथे प्रवाशांना नाइलाजास्तव रिक्षा किंवा कॅब, खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो.

---

पीसीएमसी मेट्रो स्थानकावरून उपनगरांतील रिक्षा भाडे (रुपयांत)

उपनगर                                     - दिवसाचे भाडे                         - रात्रीचे भाडे

चिखली                                     -             २००                         - ३००

कुदळवाडी                         -             १५०                         - २५०
काळेवाडी, आकुर्डी, चिंचवड -             १००                         -            १५०

रावेत, ताथवडे, पुनावळे, वाकड -             २००                                    -             ३००
भोसरी                                     -             १५०                                     -             २००

दिघी                                     -             २५०                                     -            ३५०
---- 

फिडर सेवेच्या अभावामुळे निर्माण झालेले प्रश्न

चिंचवडगाव, थेरगाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, रावेत, किवळे यांसारख्या मोठ्या उपनगरांतून मेट्रो स्थानकापर्यंत येण्यासाठी थेट पुरेशी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा नाही. मेट्रोने कमी वेळात प्रवास होतो; पण पुरेशी फिडर बस नसल्याने स्थानकावरून घरी पोहोचण्यास ३० ते ४० मिनिटे लागतात. रात्रीच्या वेळी मेट्रोने उतरणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना फिडर सेवा नसल्याने अंधाऱ्या मार्गावरून रिक्षाने जावे लागते.

फिडर नसलेल्या भागात कशाचा आधार?

ज्या स्थानकांपर्यंत बस नाही, तिथे नागरिक स्वतःच्या दुचाकी किंवा चारचाकीने येतात. मात्र, मेट्रो स्थानकांवर पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. मेट्रोचे तिकीट ३० रुपये असले, तरी स्थानकापासून घरापर्यंत जाण्यासाठी रिक्षाचालक १०० ते ३५० रुपये आकारतात. हे भाडे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नाही.

...........

पीसीएमसी व नाशिक फाटा मेट्रो स्थानकावरून सुरू असलेली फिडर सेवा

मार्ग क्र.            -             ठिकाण (पासून - पर्यंत)             - पहिली बस - शेवटची बस - वारंवारिता

३५६             -             नाशिक फाटा ते सेक्टर १२ - ६ः२०            - ८ः१५             - १ तास ५० मि.

मेट्रो ३१            -             पिंपरी मेट्रो ते काळेवाडी फाटा - ६ः३० - ९ः३०             - १५ मि.
मेट्रो ३२ -             निगडी ते नाशिक फाटा             - ८ः१५ - ६ः४५             - १ तास ३० मि.

पी १३             -             पिंपरी मेट्रो ते वाल्हेकरवाडी - ६ः१५ - १०             - १ तास ३० मि.
बी १             -             दिघी ते पिंपरी मेट्रो             - ७ः१५ - ९ः२५             - १ तास ३५ मि.

---------

फिडर बस सेवेचे नियोजन ‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून केले जाते. ज्या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त आहे, तेथे बसची संख्या आणि वारंवारिता वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.  - चंद्रशेखर तांबवेकर, जनसंपर्क अधिकारी, ‘महामेट्रो.’ 

 

मेट्रो स्थानकावरून पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत भागात जाण्यासाठी आम्ही बसच्या फेऱ्यांचे काटेकोर नियोजन केले आहे. नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक लाभ घ्यावा. -किशोर चौहान, जनसंपर्क अधिकारी, ‘पीएमपीएमएल’

 

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Metro: Feeder bus woes persist at most stations.

Web Summary : Pimpri's metro faces 'last mile connectivity' issues. Only two of six stations have adequate feeder bus services, forcing commuters to rely on expensive private transport. Ridership is affected by this inconvenience. More feeder buses are needed.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो