हिंजवडीत ऑटो सर्व्हिस सेंटरमध्ये कर्मचाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 15:55 IST2025-09-11T15:55:14+5:302025-09-11T15:55:58+5:30
पिंपरी : एका ऑटो सर्व्हिस सेंटरमध्ये कामाचे पैसे आणि इन्सेंटिव्ह मागण्यासाठी गेलेल्या एका कर्मचाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ करून त्याला तेथून ...

हिंजवडीत ऑटो सर्व्हिस सेंटरमध्ये कर्मचाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ; गुन्हा दाखल
पिंपरी : एका ऑटो सर्व्हिस सेंटरमध्ये कामाचे पैसे आणि इन्सेंटिव्ह मागण्यासाठी गेलेल्या एका कर्मचाऱ्याला जातिवाचक शिवीगाळ करून त्याला तेथून हाकलून देण्यात आले. ही घटना ६ मे रोजी हिंजवडी येथे घडली असून, याप्रकरणी ९ सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एका ३९ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नीरज शीतल शहा (वय ३७, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेल्समन म्हणून काम करीत असताना त्यांच्या कामाचे पैसे आणि इन्सेंटिव्ह मागण्यासाठी संशयिताकडे गेले. त्यावेळी संशयिताने त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली आणि हाकलून दिले.