शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad traffic : हिंजवडीजवळील भूमकर चौक, भुजबळ चौकात वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:59 IST

मुठा नदीवरील रस्ता रुंदीकरणाअभावी रोजचीच समस्या; वाहनचालक, स्थानिक नागरिक त्रस्त; वाढती वाहतूक आणि सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे कोंडीत भर

वाकड : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील रावेत ते बाणेरदरम्यान वाकडजवळील भूमकर चौक, भुजबळ चौक, मुठा नदीवरील पूल परिसरात गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली. 

रखडलेले रस्ता रुंदीकरण, मुळा नदीवरील अरुंद पूल, भुजबळ चौक, भूमकर चौक येथील वाढती वाहतूक आणि सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे यामुळे कोंडी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. हिंजवडी आयटी पार्क आणि पुणे-मुंबई महामार्गाला जोडणारा भुजबळ चौक हा महत्त्वाचा दुवा आहे. आयटी हब, औद्योगिक क्षेत्र आणि निवासी वसाहती यामुळे या मार्गावर वाहनांची गर्दी सतत वाढत आहे.

प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉरचा प्रकल्प रखडलेलाच

रावेत ते नऱ्हेदरम्यान २४ किलोमीटरच्या सहापदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरची योजना असून, या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या प्रकल्पाला अद्याप प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. रावेत–वाकडदरम्यान सेवा रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम प्रस्तावित असून, महामार्ग प्राधिकरण व पिंपरी–चिंचवड महापालिका यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया करत आहेत. हे काम रखडलेले आहे.

भुयारी मार्गाचा विस्तार आणि रस्ता रुंदीकरणाचा विलंब

रावेत ते बाणेर मार्गावरील भुयारी मार्गाचा विस्तार आणि रस्ता रुंदीकरणाचा विलंब हीच मोठी समस्या बनली आहे. भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन रुंदीकरण तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. वाहतूक नियोजन सुधारल्यास आणि अडथळे दूर केल्यास कोंडीवर कायमस्वरूपी उपाय मिळू शकतो. तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक कोंडी सुरूच राहणार आहे.या कारणामुळे वाहतूक कोंडी...

भुयारी मार्गालगत असलेली अनधिकृत दुकाने.

अनधिकृत रिक्षा थांबा.

बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या गाड्या.

अवैध खासगी वाहतुकीच्या गाड्यांचा विळखा.

रस्त्यालगत उभे असलेले फळ विक्रेते व त्यांची वाहने. 

रस्ता रुंदीकरणाबरोबर विविध उपाययोजना करण्याबाबत वारंवार संबंधित विभागाशी आमचा पाठपुरावा सुरू असतो, मात्र, फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने येथील कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यांच्याकडून होणाऱ्या संथगती कामाचा फटका वाहतूक व्यवस्थेस बसत आहे. मुठा नदीवरील पुलाचे रुंदीकरण सुरू असून, लवकरच ही कोंडी फुटून वाहतूक सुरळीत होईल.  - राहुल सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग 

महापालिका हद्दीतील बहुतांश काम आम्ही पूर्ण केले आहे. महामार्गालगत असलेल्या सेवारस्ता रुंदीकरण बाकी आहे. ते भूसंपादनाअभावी राहिले आहे. ज्या ठिकाणी भूसंपादन झाले आहे, त्या ठिकाणी लवकरात लवकर रस्ता रुंदीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत.  - बापू गायकवाड, सहशहर अभियंता 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Hinjewadi Traffic: Congestion at Bhumkar Chowk, Bhujbal Chowk

Web Summary : Traffic jams plague Hinjewadi's Bhumkar & Bhujbal Chowks due to road widening delays, narrow bridges, and encroachments. An elevated corridor project is stalled. Unofficial shops, taxi stands, and parking worsen the chaos. Authorities cite land acquisition issues for delays.
टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड