इथे धंदा करायचा असेल तर ५० रुपये दे..! नकार दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 18:26 IST2026-01-15T18:23:47+5:302026-01-15T18:26:52+5:30
‘तू खूप पैसे कमवतोस, इथे धंदा करायचा असेल तर ५० रुपये दे’ अशी मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संशयितांनी शिवीगाळ करत खुर्चीने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली.

इथे धंदा करायचा असेल तर ५० रुपये दे..! नकार दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
पिंपरी : केवळ ५० रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने तरुणाच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. रावेत परिसरातील एका चहा टपरीवर मंगळवारी (दि. १३ जानेवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
विनोद ऊर्फ विन्या निजप्पा गायकवाड (वय २७, रा. रमाबाईनगर, रावेत), अक्षय प्रभाकर साबळे (वय ३२, रा. काळभोरनगर, आकुर्डी, पुणे) व भूषण भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मयूर अशोक लोखंडे (वय ३०, रा. रुपेश कॉलनी, दत्तवाडी, आकुर्डी, मूळ रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. १४) याबाबत रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर लोखंडे यांचा भंगार वस्तू खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी हे चहा पिण्यासाठी रावेतमधील हॉटेलमध्ये बसले असताना विनोद गायकवाड याने ‘तू खूप पैसे कमवतोस, इथे धंदा करायचा असेल तर ५० रुपये दे’ अशी मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संशयितांनी शिवीगाळ करत खुर्चीने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली.