Accident : हँडब्रेक विसरला अन् जीव गेला..; पिंपरीत टेम्पोखाली सापडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:03 IST2026-03-17T12:01:27+5:302026-03-17T12:03:16+5:30

- टेम्पो अचानक मागे येत असल्याचे लक्षात येण्यापूर्वीच ती टेम्पोच्या चाकाखाली आली.

pimpari-chinchwad accident forgot to use handbrake and lost her life 11-year-old girl dies after being hit by tempo in Pimpri | Accident : हँडब्रेक विसरला अन् जीव गेला..; पिंपरीत टेम्पोखाली सापडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

Accident : हँडब्रेक विसरला अन् जीव गेला..; पिंपरीत टेम्पोखाली सापडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

पिंपरी : गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा हँडब्रेक लावण्यास चालक विसरल्याने टेम्पो अचानक मागे सरकला. या टेम्पोखाली चिरडल्याने ११ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १६ मार्च) दुपारी साडेचारच्या सुमारास सोमाटणे फाटा परिसरात घडली.

ज्ञानेश्वरी मुऱ्हे (वय ११) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाटा परिसरात गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा टेम्पो उतारावर होता. मात्र चालकाने टेम्पोचा हँडब्रेक व्यवस्थित लावला नाही. त्यामुळे काही वेळातच टेम्पो अचानक मागे सरकू लागला.

त्यावेळी ज्ञानेश्वरी मुऱ्हे ही परिसरातील इतर मुलांसोबत रस्त्यालगत खेळत होती. टेम्पो अचानक मागे येत असल्याचे लक्षात येण्यापूर्वीच ती टेम्पोच्या चाकाखाली आली. या भीषण अपघातात ती गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. निष्काळजीपणामुळे चिमुरडीचा जीव गेल्याने स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिली.

Web Title : लापरवाही: हैंडब्रेक लगाने में विफलता से बच्ची की दर्दनाक मौत

Web Summary : पिंपरी में एक 11 वर्षीय लड़की की मौत हो गई क्योंकि गैस सिलेंडर ट्रक बिना हैंडब्रेक के पीछे लुढ़क गया। ज्ञानेश्वरी मुरहे पास में ही खेल रही थी जब यह दुर्घटना हुई। स्थानीय लोग लापरवाह ड्राइवर के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग कर रहे हैं क्योंकि पुलिस जांच कर रही है।

Web Title : Negligence: Unapplied Handbrake Leads to Tragic Death of Girl

Web Summary : An 11-year-old girl died in Pimpri after a gas cylinder truck rolled back due to an unapplied handbrake. Dnyaneshwari Murhe was playing nearby when the accident occurred. Locals are demanding strict action against the negligent driver as police investigate.