रस्ता ओलांडताना बसच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 17:24 IST2021-09-03T17:24:26+5:302021-09-03T17:24:33+5:30
बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

रस्ता ओलांडताना बसच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू; पिंपरीतील घटना
पिंपरी : भरधाव जाणाऱ्या बसने रस्ता ओलांडत असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सात वाजता सरदार चौक, स्पाईन रोड, मोशी प्राधिकरण येथे घडला.
बाबू बसराज कोन्तल (वय ४८, रा. राजेशिवाजी नगर, चिखली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत बाबू यांचे भाऊ हनुमंता बसराज कोन्तल (वय ३९, रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक केशव पांडुरंग पावडे (रा. पदमावती रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंता यांचा भाऊ बाबू बुधवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पायी चालत कामावर जात होते. सरदार चौक, स्पाईन रोड, मोशी प्राधिकरण येथे ते रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या आरोपी चालवत असलेल्या बसने त्यांना जोरात धडक दिली. त्यात बाबू यांचा मृत्यू झाला.