नितीन गिलबिले खून प्रकरण धक्कादायक वळणावर; माजी नगरसेवक किसन तापकीरांच्या समावेशाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 21:04 IST2025-11-26T21:03:20+5:302025-11-26T21:04:36+5:30

गुन्ह्यातील अचूक कारण, संबंध, आर्थिक किंवा वैयक्तिक वाद, तसेच तापकीर यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हस्तक्षेप याबाबत पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू आहे

Nitin Gilbile murder case takes a shocking turn; Ex-Corporator Kisan Tapkir's involvement creates excitement | नितीन गिलबिले खून प्रकरण धक्कादायक वळणावर; माजी नगरसेवक किसन तापकीरांच्या समावेशाने खळबळ

नितीन गिलबिले खून प्रकरण धक्कादायक वळणावर; माजी नगरसेवक किसन तापकीरांच्या समावेशाने खळबळ

पिंपरी : चर्‍होलीतील वडमुखवाडी येथे व्यावसायिक नितीन गिलबिले यांचा गोळीबार करून खून करणाऱ्या टोळीतील तिघांना अटक करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ माजी नगरसेवक किसन तापकीर यांचाही या खून प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा संशयितांमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  

नितीन शंकर गिलबिले (३७, रा. वडमुखवाडी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. अमित जीवन पठारे (३५, रा. पठारेमळा, चर्‍होली), विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोळू, ता. खेड) आणि सुमित फुलचंद पटेल (३१, रा. गायकवाडनगर, दिघी) या तिघांना याप्रकरणी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी वडमुखवाडी येथील अलंकापुरम रस्त्यावर नितीन गिलबिले काही जणांसोबत थांबले असताना अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे कारमधून तेथे आले. त्यांनी गिलबिले यांना कारमध्ये बसवून त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांचा खून केला. त्यानंतर संशयित पसार झाले.    

दरम्यान, संशयित ताम्हिणी घाट परिसरात असल्याची माहिती मिळाली. तेथील शोधमोहिमेत एका संशयित वाहनाचा पाठलाग करून पोलिसांनी विक्रांत ठाकूर व सुमित पटेल यांना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल जप्त केले. मुख्य संशयित अमित पठारे याला दिघी पोलिसांनी वाघोली येथून अटक केली. सुमित पटेल हा गोळीबाराच्या आधी व नंतरही संशयितांसोबत फिरत होता, त्यामुळे त्याचाही गुन्ह्यात समावेश केला. 

जमीन व्यवहार व आर्थिक कारणातून खून केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान किसन तापकीर यांचे नाव संशयितांकडून समोर येत असल्याने तपासाची दिशा बदलली आहे. गुन्ह्यातील अचूक कारण, संबंध, आर्थिक किंवा वैयक्तिक वाद, तसेच तापकीर यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हस्तक्षेप याबाबत पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू आहे. तापकीर यांचा या गुन्ह्यातील सहभाग कोणत्या स्वरूपाचा, हे तपासात स्पष्ट व्हायचे असले तरी त्यांचे नाव पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. दिघी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.       

नितीन गिलबिले खून प्रकरणात किसन तापकीर यांचे नाव समोर आल्याने संशयितांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्यांच्या शोध सुरू आहे.  -प्रमोद वाघ, वरिष्ठ निरीक्षक, दिघी पोलिस ठाणे.  

 

Web Title : नितिन गिलबिले हत्याकांड: पूर्व पार्षद किसन तापकीर का नाम; पिंपरी में हलचल

Web Summary : नितिन गिलबिले हत्याकांड में पूर्व पार्षद किसन तापकीर का नाम सामने आने से मामला गरमा गया है। तीन गिरफ्तार, तापकीर की भूमिका की जांच जारी, पिंपरी में राजनीतिक उथल-पुथल। पुलिस तलाश कर रही है।

Web Title : Ex-Corporator Implicated in Nitin Gilbile Murder Case; Stir in Pimpri

Web Summary : Nitin Gilbile murder case takes a turn as ex-corporator Kisan Tapkir is implicated. Three arrested, Tapkir's involvement investigated, causing political turmoil in Pimpri. Police search underway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.