शहरातील शाळांनी अग्निशामक सुरक्षेची पूर्तता करा; महापालिकेचे शाळांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:27 IST2025-01-01T12:24:01+5:302025-01-01T12:27:58+5:30

शाळांना दिलेली मुदत संपल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नोटिसा बजावल्या जाणार

Municipal Corporation letter to schools: Schools in the city should comply with fire safety regulations: Notices will be issued to those who do not comply | शहरातील शाळांनी अग्निशामक सुरक्षेची पूर्तता करा; महापालिकेचे शाळांना पत्र

शहरातील शाळांनी अग्निशामक सुरक्षेची पूर्तता करा; महापालिकेचे शाळांना पत्र

पिंपरी : शहरातील आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून अग्निशामक सुरक्षा प्रमाणपत्राची पूर्तता करण्यासाठी ६७३ शाळांना पत्र पाठविण्यात येणार आहेत. ज्या शाळा सुरक्षा प्रमाणपत्र घेणार नाहीत, त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

शहरातील रुग्णालयांपाठोपाठ शाळांमध्ये अग्निसुरक्षेची काय व्यवस्था आहे, याची तपासणी अग्निशमन दलाकडून केली जाणार आहे. या कार्यवाहीचा पहिला टप्पा म्हणून शाळांना अग्निशामक सुरक्षा प्रमाणपत्राची पूर्तता करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार आहे. त्यानंतर संबंधितांना त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाईल. या मुदतीमध्ये त्यांनी आगीपासून सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणे व अन्य बाबी बसविणे, बसविलेली उपकरणे सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करणे गरजेचे आहे. शाळांना दिलेली मुदत संपल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यानंतरही शाळांकडून याबाबत दुर्लक्ष करण्यात आल्यास 'अग्निसुरक्षा अधिनियम-२००५' नुसार संबंधित शाळांविरोधात अग्निशमन दलाकडून कार्यवाही केली जाणार आहे.

तीन हजार ८१२ शाळांना नोटिसा...

महापालिका अग्निशमन दलाने आत्तापर्यंत अग्निसुरक्षा प्रमाणपत्रासाठी शहरातील विविध तीन हजार ८१२ आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. ४८२ आस्थापनांची अग्निशमन दलाच्या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली, तर १७२ जणांना व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

शहरात आगीच्या सातत्याने होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या सूचनेनुसार शाळांनी अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र घेतले आहे का, याची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी पुढील आठवडाभरात शाळांना पत्र पाठविण्यात येणार आहे. - ऋषिकांत चिपाडे, उपाधिकारी, अग्निशमन विभाग, महापालिका

Web Title: Municipal Corporation letter to schools: Schools in the city should comply with fire safety regulations: Notices will be issued to those who do not comply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.