पुणे-लोणावळा मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; लोकल गाड्यांच्या १४ फेऱ्या रद्द

By अविनाश रावसाहेब ढगे | Published: January 20, 2024 05:12 PM2024-01-20T17:12:33+5:302024-01-20T17:13:20+5:30

एमजीआर चेन्नई- लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्र. १२१६४) साडेतीन तास उशिराने धावणार आहे....

Megablock on Sunday on Pune-Lonavala route; 14 rounds of local trains cancelled | पुणे-लोणावळा मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; लोकल गाड्यांच्या १४ फेऱ्या रद्द

पुणे-लोणावळा मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; लोकल गाड्यांच्या १४ फेऱ्या रद्द

पिंपरी :पुणे- लोणावळा मार्गावर इंजिनीअरिंग आणि तांत्रिक कामांकरिता रविवारी (दि. २१) रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्यांच्या १४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. एमजीआर चेन्नई- लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस (गाडी क्र. १२१६४) साडेतीन तास उशिराने धावणार आहे.

या लोकल रद्द

पुण्याहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या रद्द गाड्या

१. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९:५७, ११:१७, दुपारी ३:०० आणि सायंकाळी ४:२५, ६:०२ वाजता सुटणारी लोकल.

२) शिवाजीनगरहून तळेगावकरिता दुपारी ३:४७, ५:२० वाजता सुटणारी लोकल.

लोणावळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या रद्द गाड्या

१. लोणावळ्याहून शिवाजीनगरकडे सकाळी १०:०५, सायंकाळी ५:३०, ६:०८, ७:३५ वाजता सुटणारी लोकल.

२. लोणावळ्याहून पुणेसाठी दुपारी २:५०, सायंकाळी ७:०० वाजता सुटणारी लोकल.

३. तळेगाव येथून पुणेसाठी सायंकाळी ४:४० वाजता सुटणारी लोकल.

Web Title: Megablock on Sunday on Pune-Lonavala route; 14 rounds of local trains cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.