शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांची जागा घेताहेत मॉल

By admin | Updated: September 7, 2016 01:18 IST

आधुनिकतेचा अंगीकार करून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील दुकानांचा लूक बदलत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.

पिंपरी : आधुनिकतेचा अंगीकार करून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील दुकानांचा लूक बदलत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. शहराच्या प्रमुख चौकांत आणि महापालिकेच्या समोरील मुंबई-पुणे महामार्गालगत पारंपरिक पद्धतीच्या जुन्या दुकानांचेही रुपडे पालटले आहे. मॉल संस्कृतीच्या जमान्यात काचेची चकचकीत दुकाने पहावयास मिळू लागली आहेत. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधांच्या पूर्ततेकडे महापालिका गांभीर्याने लक्ष देत आहे. टपऱ्या, हातगाड्या आणि पथारीवाले यांच्यासाठी हॉकर्स झोन धोरण महापालिकेने अवलंबले आहे. टपरीधारक आणि हातगाडीवाले यांचे सर्र्वेक्षण करून त्यांना विशिष्ट ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोन निश्चित केले जाणार आहेत. जेणेकरून शहराला बकालपणा येईल अशा पद्धतीने हातगाड्या, टपऱ्या दिसून येणार नाहीत. हा त्यामागील उद्देश आहे. शिवाय स्वच्छता राखली जाईल, हा प्रमुख उद्देश आहे. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर पुणे-मुंबई महामार्गावर, तसेच अन्य प्रकल्पांच्या ठिकाणी रस्त्यालगत दर्शनी भागात ज्या इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. त्यांना काही नियम लागू करण्यात आले आहेत. अशा ठिकाणच्या व्यावसायिक इमारतींच्या ठिकाणी प्रशस्त वाहनव्यवस्था असावी, त्याचबरोबर त्या इमारतींना कॉर्पोरेट लूक द्यावा, अशा सूचना महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून दिल्या जात आहेत. (प्रतिनिधी)