शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : भोसरी मतदारसंघात भाजपाचा विकासावर, अपक्षांचा कुरघोडीवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 12:49 IST

भोसरी हा ऐकेकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता..

ठळक मुद्देभोसरी मतदारसंघ : राष्ट्रवादीने केले अपक्ष उमेदवाराला केले पुरस्कृत 

पिंपरी : सहयोगी आमदार महेश लांडगे यांना भाजपानेभोसरी मतदारसंघातून उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस आघाडीने थेट पक्षाचा उमेदवार न देता अपक्ष उभे राहिलेल्या माजी आमदार विलास लांडे यांना पुरस्कृत केले. विद्यमान व माजी आमदार यांच्यामध्ये ही दुरंगी लढत होत आहे. भाजपाकडून विकासाचा दावा, अपक्ष उमेदवाराकडून पोलखोल करून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे.  भोसरी हा ऐकेकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.  त्यामुळे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कुणाला तिकीट देणार याकडेसर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र शेवटपर्यंत उमेदवार निश्चित न झाल्याने राष्ट्रवादीने विलास लांडे यांना पुरस्कृत केले. भाजपाचे सर्वच नगरसेवक व पदाधिकाºयांनी राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने अगोदरच प्रचारात आघाडी घेतली होती. सोशल मीडिया, पदयात्रा व सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रॅली मतदारसंघात पार पडली. मात्र अपक्ष उमेदवार असलेले लांडे यांना कार्यकर्त्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने लांडे यांना पुरस्कृत केले असले, तरी राष्ट्रवादीच्या कोणत्याही दिग्गज नेत्यांनी जाहीर सभा अद्याप झालेली नाही. .........

मित्र पक्षाकडून दुजाभाव विद्यमान आमदार लांडगे हे पाच वर्षांत केलेल्या विकासाच्या मुद्यावर प्रचार करत असले, तरी असा काही विकास झालाच नाही, असा दावा करीत माजी आमदार लांडे कुरघोडी करत आहेत. दोघांमधील लढत प्रतिष्ठेची झाली असली तरी दोघांनाही स्वत:च्या मित्रपक्षाकडूनच धोका असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने लांडे यांना पुरस्कृत केले असले तरी राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे कार्यकर्ते थेट सक्रीय असल्याचे दिसत नाहीत. तसेच, भोसरी मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. मात्र ऐनवेळी भाजपाच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने शिवसेनेमध्ये काही प्रमाणात नाराजीची भावना आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही भाजपा उमेदवारावाला पाठिंबा देणार असे बोलत असले तरी त्यांच्यातील नाराजी लपून राहिली नाही. त्यामुळे दोघाही आजी-माजी आमदारांना आघाडी व महायुतीकडून पूर्ण पाठिंबा मिळत नसल्याची चर्चा आहे. .................

मित्र पक्षाकडून दुजाभाव विद्यमान आमदार लांडगे हे पाच वर्षांत केलेल्या विकासाच्या मुद्यावर प्रचार करत असले, तरी असा काही विकास झालाच नाही, असा दावा करीत माजी आमदार लांडे कुरघोडी करत आहेत. दोघांमधील लढत प्रतिष्ठेची झाली असली तरी दोघांनाही स्वत:च्या मित्रपक्षाकडूनच धोका असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीने लांडे यांना पुरस्कृत केले असले तरी राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे कार्यकर्ते थेट सक्रीय असल्याचे दिसत नाहीत. तसेच, भोसरी मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. मात्र ऐनवेळी भाजपाच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने शिवसेनेमध्ये काही प्रमाणात नाराजीची भावना आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही भाजपा उमेदवारावाला पाठिंबा देणार असे बोलत असले तरी त्यांच्यातील नाराजी लपून राहिली नाही. त्यामुळे दोघाही आजी-माजी आमदारांना आघाडी व महायुतीकडून पूर्ण पाठिंबा मिळत नसल्याची चर्चा आहे. ..........................

इतर उमेदवारांचा फटका कोणाला तर उमेदवारांचा फटका कोणाला बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र पवार, वंचित बहुजन आघाडीचे शाहनवाज शेख, समाजवादी पार्टीचे वहिदा शेख, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ज्ञानेश्वर बोराटे,जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास गजरमल, महाराष्ट्र मजदूर पार्टीचे भाऊसाहेब अढागळे, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख हे ही रिंगणात आहेत. त्यांचाही आपआपल्या परीने प्रचार सुरू असून, बैठका व कोपरा सभा घेतल्या जात आहेत. इतर प्रमुख पक्षातील उमेदवाराचा कोणाला फटका बसणार याची उत्सुकता आहे.

टॅग्स :bhosariभोसरीbhosari-acभोसरीElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस