शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद

By admin | Updated: June 26, 2016 04:45 IST

लोणावळा शहरात शुक्रवारी पावसाचे आगमन झाल्याचे समजताच शनिवारी पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. सहारा पुलाजवळील धबधबा दुपारनंतर

लोणावळा : लोणावळा शहरात शुक्रवारी पावसाचे आगमन झाल्याचे समजताच शनिवारी पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. सहारा पुलाजवळील धबधबा दुपारनंतर वाहू लागल्याने या धबधब्याखाली भिजण्याचा पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटला. मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या मॉन्सूनने शुक्रवारी लोणावळा, खंडाळ्यासह मावळात सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवारी सुरू झालेली पावसाची संततधार शनिवारीही कायम राहिल्याने डोंगरांवरून धबधबे वाहू लागले आहेत. भुशी धरणाच्या पातळीतही वाढ झाली आहे. शनिवार व रविवारच्या सुटीचे औचित्य साधत लोणावळ्यात सकाळपासूनच पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यात दिवसभर वाहतूककोंडी झाली होती. लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव हे कर्मचाऱ्यासह वाहतूककोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत होते.पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे भुशी धरण व लायन्स पॉइंटच्या दिशेने जात होते. रस्त्याच्या कडेला दिसेल त्या लहान-मोठ्या धबधब्यांखाली पर्यटक भिजण्याचा आनंद घेत होते. युवकांच्या समूहांबरोबर कुटुंबासहही अनेक पर्यटक लोणावळ्यात आले होते. (वार्ताहर)शहरातील अंतर्गत रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी भुशी धरण व लायन्स पॉइंट परिसरातून परतीच्या मार्गावर येणारी वाहने रायवूड येथून खंडाळा रेल्वे गेटमार्गे राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली होती. सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी गर्दी केली होती.