शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानाच्या प्रतीक्षेत आयटीनगरी

By admin | Updated: August 31, 2016 01:07 IST

राजीव गांधी आयटी पार्क, जिल्ह्यातील सर्वाधिक महसूल असणारी ग्रामपंचायत असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान किंवा उद्यान उपलब्ध नाही

हिंजवडी : राजीव गांधी आयटी पार्क, जिल्ह्यातील सर्वाधिक महसूल असणारी ग्रामपंचायत असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान किंवा उद्यान उपलब्ध नाही. खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे मुलांची गैरसोय होत आहे. अनेक क्षेत्रांत आघाडीवरील हिंजवडी ग्रामपंचायतीने चांगल्या दर्जाचे उद्यान उभारावे, अशी मागणी होत आहे. मिळेल तेथे, मिळेल तितक्या जागेत बांधकाम व्यावसायिक इमारती उभारत आहेत. परिणामी, जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. व्यावसायिक स्तरावरही मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. वाढती वाहनसंख्या आणि रहदारीमुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत आहे. हिंजवडीत मॉल्स, हॉटेल, थिएटर, विविध शो-रूम, बँका, शाळा यांचा विस्तार होत आहे. लोकसंख्या वाढत आहे. केवळ पाच वर्षांत दुपटीपेक्षा अधिक मतदार वाढले आहेत. भाडेतत्त्वावर राहणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. परिणामी, गावचे गावपण हरवले आहे. यामुळेच महापालिकेप्रमाणेच चांगल्या दर्जाचे उद्यान हिंजवडी परिसरात व्हावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.(वार्ताहर)