शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

हतबल पालक आणि बॉम्बवर मुले

By admin | Updated: August 7, 2015 00:37 IST

कितीही वाटले तरी आणि शाळा कितीही जवळ असली, तरी सध्या पालकांना स्वत: मुलांना शाळेत सोडणे शक्य होत नाही, हे घरोघरचे भेदक वास्तव! यामागची

कितीही वाटले तरी आणि शाळा कितीही जवळ असली, तरी सध्या पालकांना स्वत: मुलांना शाळेत सोडणे शक्य होत नाही, हे घरोघरचे भेदक वास्तव! यामागची काहीही कारणे असली, तरी काळजावर दगड ठेवून प्रत्येक पालक आपल्या मुलाला बसमध्ये सोडायला जातो. सकाळच्या वेळेत अर्धवट झोपेतील मूल पाठीवर काही किलोची सॅक आणि हातात टिफिनची बॅग सांभाळत बसमध्ये चढते...आणि हा हा म्हणता गर्दीत गायब होते. सगळ्याच मुलांचे गणवेश एकच असल्याने आपले मूल बसले आहे की उभेच आहे, हे समजत नाही. बस निघते. पाठमोऱ्या बसला उगीचच हात हलवून प्रत्येक जण (यामध्ये बहुतांश आया) आपल्या मुलाला निरोप देतात. बसमधील गर्दीने प्रत्येक मुलाचा श्वास कोंडलेला असतो. रस्त्यावरील खड्डे, गतिरोधक, वळण, साधा ब्रेक, अचानक ब्रेक, फर्स्ट गिअर...प्रत्येक वेळी मुले एकमेकांवर आदळत-कोसळत शाळेपर्यंत पोहोचतात. शाळा सुटल्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास; पण चेहऱ्यावर थोडा आनंद, कारण घरी जायचे असते.शाळांना द्यावे लागते महिन्याचे भाडेशाळांची साखळी असणाऱ्या शिक्षणसंस्थांची स्वत:ची वाहतूक यंत्रणा आहे. ते मनमानी भाडेआकारणी करतात. हे उत्पन्न संस्थेच्या तिजोरीत जाते. तर, छोट्या संस्था खासगी बस वाहतूकदारांचा आधार घेतात. या संस्था मोबदला म्हणून वर्षापैकी एक महिन्याचे भाडे घेऊन विद्यार्थी वाहतुकीस परवानगी देत असतात. पालकांकडून बाराही महिन्यांचे भाडेभाड्याचे टप्पेही मनमानी असतात. सर्वसाधारण एक ते चार किलोमीटरसाठी काही संस्था सातशे ते हजार भाडे आकारतात. शाळेपासून पाचशे मीटरवर विद्यार्थी असला, तरी सवलत नाही. दिवाळी, नाताळ, उन्हाळा सुटीचेही भाडे घेतले जाते. वर्षातील तीस टक्के दिवस शाळांना सुटी असते, तरीही पैसे उकळतात.समित्या कागदावरचमोटार वाहन नियमांतर्गत स्कूल बस सुरक्षितता समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करावी. सहा महिन्यांतून एकदा आढावा बैठक होईल...परंतु, अशी समिती स्थापनच झालेली नाही, अशी धक्कादायक माहिती मिळाली.१‘पत्रकारिता परमो धर्म’ या उपक्रमानिमित्त ‘लोकमत टीम’ने शहरातील विविध शाळांच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी बस वाहतूक नेमकी कशी होती, याची पाहणी केली. यामध्ये ठळकपणे निदर्शनास आलेली बाब म्हणजे ‘हतबल पालक आणि बॉम्बवरील मुले’. रिक्षा, व्हॅन या शंभर टक्के अनधिकृत गॅस व कीट लावून विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. शाळांच्या बसला आजवर किरकोळ अपघात अनेक वेळा झाले आहेत. मात्र, परिस्थितीत सुधारणा नाहीत. ‘आरटीओ’ अधिकारी लक्ष देत नाहीत, वाहतूक पोलीस पाहणी करत नाहीत, शाळा म्हणते आमचा संबध नाही...मग पालकांनी पाहायचे कोणाकडे? दर वर्षी बस फीमध्ये वाढ ठरलेलीच. मुळात आहे तीच जादा; पण नाइलाजाने पालक ती भरतो. शाळांमधील पालकांच्या संघटना या शाळा प्रशासनाच्या दावणीला बांधलेल्या. आपल्या मूलाला त्रास होऊ नये यासाठी पालक शाळेकडे थेट तक्रार करायला धजावत नाहीत.२‘लोकमत टीम’ ज्या वेळी पालकांच्या प्रतिक्रिया घेऊ लागली, त्या वेळी शाळा आणि बस-व्हॅनविरोधात तक्रारींचा पाऊस पडला. पण, आमचे तेवढे नाव छापू नका, असाही एक सावध पवित्रा सर्वांचा होता. चालक म्हणतात, ‘मी पगार घेतो. बसचे कंत्राट शाळा आणि मालकामध्ये झालेले आहे.’ मालक म्हणतात, ‘डिझेलचे भाव अचानकच वाढतात. त्यामुळे फटका बसतो. स्पर्धेमुळे शाळांमधील अनेकांना कमिशन द्यावे लागते. बसमधून शिक्षकांना फुकट न्यावे लागते. शाळाच आम्हाला बदनाम करतात.’ असे सगळे जण ‘तो मी नव्हेच’!नोकरीमुळे पालकांचा नाइलाज... नोकरीमुळे मुलांना शाळेत सोडविणे जमत नाही. त्यामुळे शाळांच्या अथवा खासगी वाहनांमध्ये गर्दी असली, तरी आमचा नाइलाज आहे. मात्र, शाळांनी याबाबत दखल घ्यायला हवी. खासगी बसचालक व रिक्षाचालक यांची दर आठवड्याला बैठक घ्यायला हवी. यामुळे पालक व शाळाही निश्चिंत राहतील. मुलांबाबत सुरक्षितता वाटेल. याबाबत शाळांनी नियमावली तयार करायला हवी. महाराष्ट्र स्तरावर हा विषय सर्व ठिकाणी हाताळायला हवा.- अजय अंगरख, पिंपरी