शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती बळींची प्रतीक्षा?

By admin | Updated: July 20, 2015 04:06 IST

पावसाळ्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. रविवारी दुपारी दोन मोटारींवर दरड कोसळून दोन जण

विशाल विकारी , लोणावळा पावसाळ्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. रविवारी दुपारी दोन मोटारींवर दरड कोसळून दोन जण ठार झाले आहेत. या घटनेनंतर महामार्ग सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महामार्गाची देखभाल करणारी खासगी कंपनी, रस्ते विकास महामंडळ आणि राज्य शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाच्या असंवेदनशून्य कारभारामुळे आणखी किती निरपराध लोकाचे जीव जाणार, असा खरा प्रश्न आहे. जाळीतून दगड आले खाली आडोशी बोगद्याकडे जाणाऱ्या मार्गावरील डोंगराला काही भागात दगड जाळीत पडले आहेत, तर काही ठिकाणांना अद्याप जाळ्या लावलेल्या नाहीत़ रविवारी दुपारी जिथे दरड कोसळली, तिथे धोकादायक ठिकाणास सुरक्षा जाळी होती. मात्र, ही जाळी तोडून दरड पडली. जाळ्या कुचकामी झाल्या आहेत. या संदर्भात ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे पुन्हा दुर्घटना घडली.तब्बल ३३ तास तीनही लेन बंद २२ जूनला सकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने द्रुतगती महामार्गाच्या मुंबईकडे जाणाऱ्या तीनही लेन तब्बल ३३ तास बंद होत्या़ पाऊस सुरू झाला आहे. पुन्हा या भागात जोरदार पावसात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे़जाळ्या धोकादायक खंडाळा ते खोपोली दरम्यानच्या डोंगर भागाला सुरक्षा रोप लावले आहेत. मात्र ते आता मोठ्या प्रमाणात गंजले आहेत. काही ठिकाणी डोंगराला लावलेले बोल्ट सैल झाले आहेत़, तर अनेक दगड या रोपमध्ये आले आहेत. खंडाळा बोगद्याच्या तोंडाजवळ ज्या ठिकाणी २२ जूनला दरड कोसळली होती, तिच्याच शेजारी पुन्हा काही दगड खाली आले आहेत़ सुरक्षा कठडे आणि जाळ्या धोकादायक आहेत. शेकडोंनी गमावला जीवमहामार्गावर कामशेतजवळील काही भाग व खंडाळा ते खोपोली दरम्यानचा संपूर्ण परिसर हा डोंगराळ भाग आहे़ मोठे डोंगर फ ोडून महामार्गाची निर्मिती चौदा वर्षांपूर्वी केली. २००५, २००८, २०११ व २०१३ मध्ये घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आहेत. त्यात शेकडो निरपराधांचे जीव गेले आहेत. त्याशिवाय वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागला आहे.