शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग पोलिसांच्या नशिबी खटारा वाहने

By admin | Updated: August 7, 2015 00:41 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असो, नाही तर राष्ट्रीय महामार्ग; या महामार्गावर सुरक्षेची ग्रस्त घालणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या वाट्याला मात्र शासनाने अक्षरश

विशाल विकारी , लोणावळामुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असो, नाही तर राष्ट्रीय महामार्ग; या महामार्गावर सुरक्षेची ग्रस्त घालणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या वाट्याला मात्र शासनाने अक्षरश: खटारा वाहने दिली आहेत़ जी वाहने टाकाऊ होतात, ती महामार्ग पोलिसांच्या नशिबी पडत असल्याने त्यांचा उपयोग कमी व त्रासच जास्त होत आहे़ केवळ द्रुतगती व राष्ट्रीय महामार्गावर ही समस्या नाही, तर राज्यातील बहुतांश महामार्ग पोलिसांची व टॅबची हीच अवस्था आहे़मागील काही दिवसांपासून द्रुतगती महामार्गावरील दरड कोसळून वारंवार खंडाळा घाट ते खोपोली दरम्यान वाहतूककोंडी होत असल्याने महामार्ग पोलिसांना दिवस-रात्र या परिसरात पहारा द्यावा लागत आहे़ मात्र, हे करत असताना त्यांना वाहन बंद केले, तर पुन्हा धक्का मारल्याशिवाय चालू करता येत नाही. अथवा वाहन दिवसभर चालूच ठेवून इंधनाचा चुराडा करावा लागत आहे़ द्रुतगती महामार्गावरून सातत्याने व्हीआयपींचे दौरे सुरू असतात. त्यांची पायलेटिंग करताना या मंडळींना जीव धोक्यात घालून ही खटारा वाहने पळवावी लागतात़ व्हीआयपींची वाहने व पोलिसांची वाहने यांच्यात हद्द संपेपर्यंत दीड ते दोन किमीचे अंतर असते. मात्र, कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. वास्तविक महामार्ग पोलिसांना महामार्गावर सतत पेट्रोलिंग करावे लागते. वाहनांचा पाठलाग करणे, अपघातांच्या ठिकाणी तातडीने पोहोचणे, काही घटना घडल्यास स्थानिक पोलिसांच्या अगोदर महामार्ग पोलिसांना घटनास्थळी पोहोचून परिस्थिती सांभाळावी लागते़ मात्र, तरीही त्यांच्या नशिबी अशी खटारा वाहने दिली काही वाहनांची पाहणी केली असता, त्यांचे टायर गोटा झाले आहेत़ स्टार्टर खराब झाला असल्याने वाहन बंद करता येत नाही. धक्का मारल्याशिवाय चालू होत नाही़ गाडीचे सीट व दरवाजाचे कुशन फ ाटले आहे़ वायपर नीट काम करत नाही़ वाहनांना गोल वेढ्यावर रेडियम लावण्यात आले आहे़ किमान रात्री अन्य वाहनचालकांना समोर गाडी चालली आहे, हे कळावे यासाठीचा हा खटाटोप असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले़ महामार्ग व राष्ट्रीय महामार्गाचे रक्षण करणाऱ्या महामार्ग पोलिसांकडे शासन लक्ष देणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे़