राज्यपाल आज माण दौऱ्यावर

By Admin | Updated: August 13, 2015 04:39 IST2015-08-13T04:39:22+5:302015-08-13T04:39:22+5:30

पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य सरकार, केंद्र सरकार या सर्वांचे अनेक पुरस्कार मिळविलेल्या माण ग्रामपंचायतीची देशातील विकासाचे परिपूर्ण रोल मॉडेल म्हणून निवडण्यात आलेल्या

Governor today on the tour | राज्यपाल आज माण दौऱ्यावर

राज्यपाल आज माण दौऱ्यावर

वाकड : पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य सरकार, केंद्र सरकार या सर्वांचे अनेक पुरस्कार मिळविलेल्या माण ग्रामपंचायतीची देशातील विकासाचे परिपूर्ण रोल मॉडेल म्हणून निवडण्यात आलेल्या १० ग्रामपंचायतींमध्ये निवड केली आहे. माण ग्रामपंचायतीला राज्यपाल विद्यासागर राव गुरुवारी भेट देणार आहेत.
त्यांच्या भेटीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीनेही युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या संग्रामकक्षाचे काम राज्यपाल राव पाहणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कुटे यांनी सांगितले.
माण ग्रामपंचायतीच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार’ माण गावाला मिळाला आहे. माण गावातील सर्व विकासकामांची पाहणी राज्यपाल करणार आहेत. काही आदर्श उपक्रम आणि उपाययोजनांची केंद्रस्तरावर चर्चा झाली. अनेक पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळाले. ही सर्व विकासकामे पाहण्यासाठी राज्यपाल राव येणार आहेत, असे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कुटे यांनी सांगितले. दरम्यान राज्यपालांच्या दौऱ्याची माणमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Governor today on the tour