पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकाम व्यावसायिकाची सव्वासहा कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:10 PM2022-02-17T12:10:22+5:302022-02-17T12:19:37+5:30

२०१४ ते डिसेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला...

fraud of crores builder in city by couple latest crime news | पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकाम व्यावसायिकाची सव्वासहा कोटींची फसवणूक

पिंपरी-चिंचवडमध्ये बांधकाम व्यावसायिकाची सव्वासहा कोटींची फसवणूक

Next

पिंपरी : बांधकाम व्यावसायिकाची सोल सेलिंग एजंटने सहा कोटी २४ लाख ८७ हजार ३२९ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एजंट दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली. स्टार सिटी गृहप्रकल्प, डुडुळगाव येथे २०१४ ते डिसेंबर २०२० या कालावधीत हा प्रकार घडला.

समर्थ प्रॉपर्टीजच्या प्रोप्रायटर सुप्रिया सचिन थोरात, मॅनेजर सचिन हनुमंत थोरात (दोघे रा. रेलविहार कॉलनी, बिजलीनगर, आकुर्डी) या दाम्पत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी सचिन थोरात याला अटक केली. कमल जयकिशन जेठाणी (वय ३७, रा. औंध, पुणे) यांनी १५ फेब्रुवारी २०२२ रोजी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची डुडुळगाव येथे स्टार सिटी नावाची बांधकाम साईट आहे. त्यातील ए, बी आणि सी विंगमधील फ्लॅट विक्री करण्याचे काम आरोपींना दिले. त्याबाबत सोल सेलिंग एजंटचा करारनामा केला. त्यानुसार फ्लॅटच्या किमतीच्या सव्वा टक्के कमिशन आरोपींना देण्याचे ठरले होते. फ्लॅट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांकडून आरोपींनी २७ लाख ८० हजार रुपये अनाधिकाराने स्वीकारून त्याचा हिशोब फिर्यादीला न देता सोल सेलिंग करारनाम्याचा भंग केला.

फ्लॅट बुकिंगची रक्कम फिर्यादीच्या राजमाता कन्स्ट्रक्शनच्या बँक खात्यावर भरली नाही. फिर्यादीच्या कंपनीचे बिगर तारखेच्या लेटर पॅडवर आरोपींनी बनावट संमतीपत्र तयार केले. त्याआधारे प्रेरणा को ऑपरेटिव्ह बँकेच्या रावेत शाखेत राजमाता कन्स्ट्रक्शन नावाने दुसरे समांतर चालू खाते उघडले. फ्लॅट बुकिंगचे पाच कोटी ९७ लाख सात हजार ३२९ रुपये बनावट खात्यावर जमा केले. एकूण सहा कोटी २४ लाख ८७ हजार ३२९ रुपयांची आरोपींनी फसवणूक केली. फिर्यादीने याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. फिर्यादीच्या तक्रार अर्जावरून पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी सचिन थोरात याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे तपास करीत आहेत.

Web Title: fraud of crores builder in city by couple latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.