साडेनऊ लाखांच्या दागिन्यांची डिकीतून चोरी

By Admin | Updated: October 7, 2016 04:01 IST2016-10-07T04:01:36+5:302016-10-07T04:01:36+5:30

सराफाकडून दागिन्यांची आॅर्डर घेण्यासाठी दुकानात गेलेल्या एका व्यक्तीच्या दुचाकीच्या डिकीतून ९ लाख ६२ हजारांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली़ ही घटना

Fourteen jewelery jewelery worth crores of rupees | साडेनऊ लाखांच्या दागिन्यांची डिकीतून चोरी

साडेनऊ लाखांच्या दागिन्यांची डिकीतून चोरी

पिंपरी : सराफाकडून दागिन्यांची आॅर्डर घेण्यासाठी दुकानात गेलेल्या एका व्यक्तीच्या दुचाकीच्या डिकीतून ९ लाख ६२ हजारांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली़ ही घटना बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास श्री दिनेश ज्वेलर्सशेजारी दिघी रोड भोसरी येथे घडली़ या प्रकरणी पुष्कल जया खडका (वय २६, रा़ मोरे चेंबर, इंद्रप्रस्थसमोर, रास्ता पेठ, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ .


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्कल हे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास दुचाकी (एमएच १२ एलजी २३३८) पार्क करून, श्री दिनेश ज्वेलर्स या दुकानात दागिन्यांची आॅर्डर घेण्यासाठी दुकानात गेले होते़ त्यांनी दुचाकीच्या डिकीत सुमारे ९ लाख ६२ हजार किमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवले होते़ आॅर्डर घेऊन परत आल्यानंतर दुचाकीची डिकी चोरट्यांनी कशाच्या तरी साह्याने उचकटल्याचे आढळून आले़ .


दागिन्यांची चोरी झाल्याचे ध्यानात येताच पुष्कल यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली़ पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील दुकानातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता, तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे सांगितले़ अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड करीत आहेत़(प्रतिनिधी)

Web Title: Fourteen jewelery jewelery worth crores of rupees