चारचाकीची भरगाव वेगात दुचाकीला धडक; अपघातात ६१ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 11:30 IST2021-08-10T11:22:36+5:302021-08-10T11:30:10+5:30

पिंपरीच्या तळवडे येथे त्रिवेणीनगर - तळवडे रोडवर ही घटना घडली

The four-wheeler hit the two-wheeler at high speed; 61-year-old senior dies in accident | चारचाकीची भरगाव वेगात दुचाकीला धडक; अपघातात ६१ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू

चारचाकीची भरगाव वेगात दुचाकीला धडक; अपघातात ६१ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू

ठळक मुद्दे चारचाकी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तळवडे येथे त्रिवेणीनगर - तळवडे रोडवरील अंबे स्वीट समोर सार्वजनिक रस्त्यावर ९ जुलै २०२१ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला होता.

प्रभाकर लक्ष्‍मण जाधव (वय ६१), असे अपघातातमृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी मंगल प्रभाकर जाधव (वय ५१, रा. जाधववाडी, चिखली) यांनी या प्रकरणी सोमवारी (दि. ९) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार चाकी वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल यांचे पती प्रभाकर जाधव हे  त्रिवेणीनगर - तळवडे रस्त्याने दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी चारचाकी वाहन चालकाने भरधाव वेगात प्रभाकर यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने पुढील तपास करीत आहेत.

Web Title: The four-wheeler hit the two-wheeler at high speed; 61-year-old senior dies in accident