शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक व्यक्ती कर्तृत्वाने होते उत्तुंग

By admin | Updated: September 8, 2016 01:14 IST

प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तृत्वानेच उत्तुंग होते, त्या ज्ञानाचा सुगंध आपोआपच जगभर दरवळतो, असे मत मराठी विश्वकोषाच्या संपादिका डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे : प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तृत्वानेच उत्तुंग होते, त्या ज्ञानाचा सुगंध आपोआपच जगभर दरवळतो, असे मत मराठी विश्वकोषाच्या संपादिका डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले.रोटरी क्लब आॅफ तळेगाव दाभाडेतर्फे (कै.) श्रीमती सरुबाई ज्ञानोबा काळोखे यांच्या स्मरणार्थ व मातृदिन व शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श माता व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण वाड यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. वाड यांच्या गृहविष्णू या कथासंग्रहाचे प्रकाशन सीआरपीएफचे डीआयजीरो रामतीर्थ परमहंस यांच्या हस्ते करण्यात आले.सोहळ्यात तळेगावातील सात मातांचा आदर्श माता पुरस्कार देण्यात आला. सायली जोशी, संगीता शिरसाट, सुख्मिणी सावंत, ऊर्मिला सरदार, कमल हरगापुरे, भारती लोहार, भामाबाई तोडकर या मातांचा सन्मान करण्यात आला. सहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. सुवर्णा गायकवाड (रामभाऊ परुळेकर विद्या निकेतन), सागर केंजूर (बालविकास हायस्कूल), सुरेखा रासकर (सरस्वती विद्यालय), सुनील मंडलीक (आदर्श हायस्कूल), जयश्री पावसे (लोकमान्य टिळक न.प. शाळा क्रमांक ३), शैला सरसर (कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल) या शिक्षकांचा सन्मान केला. सीआरपीएफचे डीआयजीरो परमहंस यांचाही तळेगावातील सीआरपीएफला देशभरात अव्वल नामांकन मिळाले यासाठी सन्मान करण्यात आला.क्लबचे अध्यक्ष मंगेश गारोळे यांनी प्रास्ताविक केले. नीलिमा बारटक्के यांनी सूत्रसंचालन केले. महेश महाजन यांनी आभार मानले. अशोक काळोखे, विलास शहा, विलास जाधव, प्रसाद मुंगी, यादवेंद्र खळदे, संजय पटवा, अरुण बारटक्के व किरण परळीकर यांनी आयोजनात परिश्रम घेतले. (वार्ताहर)