शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांच्या बेशिस्तीला चाप

By admin | Updated: August 27, 2015 04:49 IST

चौकात वाहतूक पोलीस दिसत नाही, याचा गैरफायदा उठवायचा. सिग्नल तोडून जायचे, हा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये सर्रास पाहावयास मिळतो.

पिंपरी : चौकात वाहतूक पोलीस दिसत नाही, याचा गैरफायदा उठवायचा. सिग्नल तोडून जायचे, हा प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये सर्रास पाहावयास मिळतो.पिंपरीतील चौकात सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा कार्यान्वित झाल्याने २२८ जणांना दंडाच्या नोटीस घरपोच झाल्या, हे माहीत असूनही बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच चौकात वाहतूक पोलीस, वॉर्डन असतानाही अर्ध्या तासात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे अनेक महाभाग आढळून आले. त्यांच्याकडून शंभर रुपये दंडाच्या पावत्या फाडण्यात आल्या. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात वाहतूक बेटाला वळसा घालून वाहने न्यावीत, असे सूचित करणारी चिन्हे लावण्यात आली आहेत. एवढेच नव्हे, तर वाहतूक बेटाला वळसा घालूनच पुढे जावे, असे सांगणाऱ्या ट्रॅफिक वॉर्डनकडे दुर्लक्ष करीत, सवयीप्रमाणे मनमानी पद्धतीने वाहने पुढे नेणाऱ्यांना गणवेशधारी वाहतूक पोलिसांनी हटकले, तरी नियमांचे उल्लंघन करून वाहनचालकांनी बेशिस्तीचा कळस गाठला. पिंपरी विभाग वाहतूक पोलीस शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. वॉर्डन आणि पोलीस कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करून पुढे येणाऱ्या वाहनचालकांना अडविले. त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. वाहतूक पोलीस कर्मचारी सूचना देत असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता पावत्या फाडून प्रत्येकाकडून दंड वसूल केला. वाहतूक नियम पाळण्याची शिस्त लावून घ्या. स्वयंशिस्त पाळा अशा शब्दांत त्यांना सुनावले. ५० (प्रतिनिधी)