शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Vaccine : कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले साडेतीन लाख; ४ हजार ८०० डोस गेले वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 21:47 IST

डोस वाय जाण्याचे प्रमाण १२ टक्के....

पिंपरी:  कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम पिंपरी-चिंचवड शहरात थंडावली आहे. आजपर्यंत साडेतीन लाख लसीकरण झाले असून त्यात ४ हजार ८१० डोस वाया गेले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. महापालिकेची आणि खासगी अशा ८४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारकडून साठा मिळत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. महापालिकेने पंचवीस हजार लसीकरणाचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात साठा नसल्याने लसीकरण थांबले आहे.

पिंपरी -चिंचवड शहरासाठी कोवीशिल्डचे ३ लाख ११ हजार १०० तर कोव्हॅक्सीनचे ३४ हजार ८०० असे एकूण ३ लाख ४५ हजार ९०० लस उपलब्ध झाल्या होत्या.  पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या  कोव्हिशील्डचे सर्वाधिक डोस मिळाले आहेत. त्यातुलनेत भारत बायोटेकने कमी डोस दिले आहेत.........................................डोस वाया जाण्याचे प्रमाण १२ टक्के  कोव्हिशील्डचे ३ लाख १० हजार ८९० (९९.९३ टक्के प्रमाण) तर  कोव्हॅक्सिनचे ३२ हजार ६१० (८४.९२ टक्के प्रमाण)  डोसेसचे लसीकरण केंद्रांवर वाटप केले होते. कोव्हिशील्डचे ३ हजार १०० आणि  कोव्हॅक्सिनचे १ हजार ७१० असे ४ हजार ८१० डोस वाया गेले आहेत. एकूण लसीकरणाच्या तुलनेत डोस वाया जाण्याचे प्रमाण १२ टक्के आहे.......................चोवीस हजार डोस शिल्लकपिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सध्या  कोव्हिशील्डचे ९ हजार ०३२ आणि  कोव्हॅक्सिनचे १५ हजार १४० असे २४ हजार १७२ लसीचे डोस शिल्लक आहेत. दोन दिवस पुरेल एवढाचा साठा उपलब्ध आहे.......................महापालिका प्रवक्ते शिरीष पोरेडी म्हणाले, ‘‘लसीकरण करताना काही डोस वाया जात असतात. कोव्हिशील्डचे तीन हजार आणि कोव्हॅक्सिनचे एक हजार सातशे एकूण चार हजार आठशे डोस वाया गेले आहे.’’...................नुसत्या दुरूस्त्या महापालिकेले पहिल्यांदा माध्यमांना माहिती दिली. त्यात कोवीशिल्डचे ३१ हजार १०० आणि कोव्हॅक्सीनचे १७ हजार १४० असे एकूण ४८ हजार १४० एवढया लसी वाया गेल्या आहेत, अशी माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने ही संख्या चार हजार आठशे आहे असे कळविले. त्यावरून माहितीबाबत महापालिकेचा घोळ असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्त