शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

Corona virus : पिंपरीत कोरोना बाधितांचा आकडा २००० वर, मंगळवारी दिवसभरात १८६ नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:29 PM

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव..

पिंपरी : पिंपरी -चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दिवसभरात १८६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून बाधितांची संख्या २०३४ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या १३७ जणांना डिस्चार्ज दिला. जुनी सांगवी, कोथरूड आणि चिंचवड येथील तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील १७१ जणांचे आणि पुण्यातील १५ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. एकुणामध्ये ११० पुरुष आणि ७६ महिलांचा समोवश आहे. शहरातील   दापोडी, पिंपळेगुरव, इंद्रायणीनगर, चिंचवड, रहाटणी, शिंदेनगर, जुनी सांगवी, यमुनानगर, पंचतारानगर- आकुर्डी, संत तुकारामनगर-भोसरी, विठ्ठलनगर, नेहरूनगर, शास्त्रीनगर, रमाबाईनगर, वैभवनगर,  साईबाबानगर-चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, ताथवडे, आनंदनगर-पिंपळे गुरव, गुलाबनगर-दापोडी, कुदळवाडी, कासारवाडी, शिवशाहीनगर-दिघी,  चिंचवड,  पिंपळे सौदागर, बौध्दनगर आणि गणेश खिंड, वारजे माळवाडी, बोपोडी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, खडकी, औध, कसबापेठ पुणे,  दौंड या भागांतील नागरिकांचा समावेश आहे. या रुग्णांवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरीतील महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  दिवसभरात ४८३ जणांना रूग्णालयात दाखल केले आहे. दोन दिवसांपूर्वी एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या घशातील द्रवाचे नमुने पाठविले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी १८६  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर २८०  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३३१ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत २०३४  जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या ७९२   सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण अधिक असले तरी कोरोनामुक्त होण्याचेही प्रमाण वाढू लागले आहेत. १२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यामध्ये आनंदनगर चिंचवड, अजंठानगर, भारतनगर, सद्गुरू कॉलनी-वाकड, बौध्दनगर, अशोकनगर, सिद्धार्थनगर- दापोडी, पिंपळे गुरव, ,मोरवस्ती, चिखली, वैभवनगर पिंपरी, जुनी सांगवी, आनंदनगर, पिंपरीगाव, गवळीनगर-भोसरी, भाटनगर-पिंपरी, वडमुखवाडी, जळगाव, पेठ, येरवडा, हडपसर, वडगाव, कोंढवा येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्यांना घरी सोउले आहे. आजपर्यंत  ११९७  जण कोरोनामुक्त झाले आहे................तिघांचा मृत्यूपवनानगर जुनी सांगवीतील ७२  वर्षांचे ज्येष्ठ, अजंठानगर चिंचवड येथील ४८ वर्षांचा तरूण, कोथरूड येथील ४७ वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे शहरातील ३५ जणांचा तर शहराबाहेरील महापालिका रुग्णालयात उपचार घेणाºया २५ अशा ६०जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल