शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : इंग्लंडहून परतलेले आणखी सहा प्रवासी कोरोना पाॅझिटिव्ह; २६७ प्रवाशांचा घेतला शोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 20:44 IST

प्रशासनासह शहरवासीयांच्या चिंतेत भर; १८८ जणांची केली कोरोना चाचणी

पिंपरी : कोरोना रुग्णांची पिंपरी-चिंचवड शहरातील संख्या कमी होत असतानाच इंग्लंडहून परतलेल्या शहरातील प्रवाशांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे प्रशासनासह शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे. या प्रवाशांपैकी बुधवारी सहा जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.

इंग्लंड येथून पिंपरी-चिंचवड शहरात परतलेल्या २६७ प्रवाशांचा आतापर्यंत शोध घेण्यात आला आहे. त्यातील १८८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील १५६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, २६ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. शहरात बुधवारी १६७ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६४८३ झाली. तर दिवसभरात १९८ जण कोरोनामुक्त झाले. २१३३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १६८७ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.
शहरात बुधवारी दिवसभरात नऊ रुग्ण दगावले. यात महापालिका हद्दीतील दोन तर शहराबाहेरील सात रुग्णांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १७५४ तर महापालिका हद्दीबाहेरील ७२९ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. बुधवारी दिवसभरात १३८९ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २१५७ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६४० रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील ६९ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७३८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९३३०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह ४० रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. शहरात बुधवारी मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये चिंचवड येथील ७४ वर्षीय पुरुष, सांगवी येथील ५५ वर्षीय महिला, तसेच चाकण, जुन्नर, अमरावती, देहूरोड, विश्रांतवाडी, आळंदी येथील रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर