शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाकडे प्रभागरचनेबाबत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2016 05:38 IST

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभागरचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकारी यशवंत माने यांच्याशी संगनमत करून

पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभागरचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकारी यशवंत माने यांच्याशी संगनमत करून केली असल्याचा आरोप खासदार अमर साबळे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, शहराच्या प्रभागरचनेचा आराखडा ७ आॅक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वीच हा आराखडा राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आला आहे. या आराखड्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभागरचनेमध्ये निवडणूक आयोगाच्या नैसर्गिक नियमांचा भंग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेत भाजपा, शिवसेना युतीची सत्ता आल्यास भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर निघतील, या भीतीने राष्ट्रवादी काँगे्रस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असे उद्योग करीत असल्याचा आरोप साबळे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. भाजपाकडून नेमण्यात येणाऱ्या अभ्यास समितीमार्फत प्रभागरचनेचा अभ्यास केला जाईल. प्रभागरचना नैसर्गिक नियमांची भंग करणारी असल्यास त्यावर हरकती नोंदविल्या जातील. तसेच तक्रारही केली जाईल, असे साबळे यांनी सांगितले. दरम्यान ७ आॅक्टोबरला प्रभाग रचना जाहीर होणार आहे. याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे(प्रतिनिधी)