शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

शहर हगणदरी मुक्तीचा संकल्प

By admin | Updated: August 17, 2016 00:49 IST

नगर परिषद कार्यक्षेत्रात स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, आपले तळेगाव या अभियानांतर्गत हगणदरीमुक्त शहर करण्याबाबतचा संकल्प नगर परिषदेने केला आहे.

तळेगाव दाभाडे : नगर परिषद कार्यक्षेत्रात स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव, आपले तळेगाव या अभियानांतर्गत हगणदरीमुक्त शहर करण्याबाबतचा संकल्प नगर परिषदेने केला आहे.यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान योजनेंतर्गत वैयक्तिक योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून १२ हजार अनुदान मिळणार आहे. तसेच १४व्या वित्तआयोग योजनेंतर्गत पाच हजार व नगर परिषदेच्या स्वनिधीतून पाच हजार असे एकूण २२ हजार रुपये अनुदान वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता उपलब्ध करून दिले जाणार आहे. नगर परिषद हद्दीतील स्वत:चे शौचालय नसलेल्या व स्वमालकीची जागा असलेल्या नागरिकांना याबाबतचा लाभ घेता येईल. उघड्यावर शौचास बसणारे नागरिक आढळून आल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायती कायद्यान्वये पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्यात येईल, याची नोंद नागरिकांनी घ्यावी.नगर परिषदेने या वर्षी एकूण २० सीटचे शौचालय नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे व तसेच एफआरपी पद्धतीचे चार सीटचे सात व दोन सीटचे १२ असे एकूण ३२ सीटचे शौचालय नगर परिषदेने नागरिकांना उपलब्ध करून दिले आहेत.ज्याप्रमाणे ज्या नागरिकांकडे स्वत:चे शौचालय नाही व स्वत:चे शौचालय बांधण्यासाठी जागा नाही अशा बाबतीत कम्युनिटी टॉयलेटची संकल्पना नगर परिषदेतर्फे राबविण्यात येणार आहे. अशा नागरिकांनी समूह स्थापन करून नगरपरिषदेकडे संपर्क साधावा.घर तिथे शौचालय बांधण्यासाठी अनुदान देऊन शहर निर्मल करण्याचा नगर परिषदेचा मानस आहे. सभापती किशोर भेगडे, पक्षप्रतोद बापूसाहेब भेगडे, उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्षा शालिनी खळदे, मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी नागरिकांना शहर स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. (वार्ताहर)