शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक उदासीन, प्रशासनही ढिम्म

By admin | Updated: April 24, 2017 04:46 IST

इंद्रायणी नदीच्या तीरावर देहू आणि आळंदी ही वारकरी सांप्रदायात अतिशय महत्त्व असलेली तीर्थक्षेत्र वसली आहेत. त्यामुळेच वर्षभर

शशिकांत जाधव / तळवडेइंद्रायणी नदीच्या तीरावर देहू आणि आळंदी ही वारकरी सांप्रदायात अतिशय महत्त्व असलेली तीर्थक्षेत्र वसली आहेत. त्यामुळेच वर्षभर या दोन्ही तीर्थक्षेत्रांची वारी करणारे वारकरी पवित्र अशा इंद्रायणी नदीत स्नान करून धन्य होत असतात. नदीला भारतीय संस्कृतीत मातेसमान मानले जाते. माता लेकराचे अपराध पोटात घालते. त्यामुळेच की नदी प्रदूषण वाढविण्यात मानव कशाचीही कसर ठेवत नाही. इंद्रायणीच्याही उदरात सर्रास कचरा टाकला जातो. सांडपाणी सोडले जात आहे. तळवडे येथे इंद्रायणी नदीवर बंधारा घालून साठविलेल्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करण्यात येतो. त्यामुळे परिसरातील शेकडो एकर क्षेत्र ओलिताखाली आहे. या बंधाऱ्यातून सतत पाण्याचा निचरा होत असल्याने इंद्रायणीची एक धार बाराही महिने सुरू असते. इंद्रायणीवर निघोजे ते तळवडे असा पूल उभारल्यामुळे येथून होणारे दळणवळण वाढले आहे. याच पुलाच्या जवळून थेट इंद्रायणी पात्रात वाहने उतरत असतात आणि बाराही महिने येथील नदीपात्रात बिनदिक्कतपणे वाहने धुतली जात असतात, सुमारे दोनशे ते अडीचशे वाहने दिवसभरात येथे धुतली जात असावीत, यामध्ये छोट्या-मोठ्या बस, कार, टेम्पो, ट्रक आणि कंटेनर्स आदी सर्व प्रकारची वाहने थेट नदीच्या पाण्यात धुतल्याने यातील सांडणारे आॅईल, पेट्रोल आदी रासायनिक पदार्थ, तसेच माती, कपडे, वाहनातील टाकाऊ पदार्थांमुळे पाण्याच्या प्रदूषणात दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे.इंद्रायणी परिसरातही खूप मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असतो. जाणारे-येणारे प्रवासी घरगुती कचरा परिसरात टाकत असतात. परिसरातील हॉटेलमध्ये उरलेले शिळे अन्न, लघुउद्योगात तयार होणारा टाकाऊ कचरा, निर्माल्य आदी प्रकारचा कचरा सातत्याने टाकला जात असतो. लघुउद्योगातील कचरा बऱ्याच वेळा वाहनात भरून नदी परिसरात आणून टाकला जात असल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. यामुळे येथील निसर्गरम्य परिसराचे रूपांतर कचऱ्याच्या मैदानात होऊ पाहत आहे.गणेशोत्सव, तसेच दुर्गोत्सव आदी काळात खूप मोठ्या प्रामाणात मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. याच काळात निर्माल्यही मोठ्या प्रमाणात नदीपात्रात येत असतात. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे.