शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शाळेत घुसून कर्मचाऱ्याला मारलं; घटनेचा व्हिडिओ व्हायरल करत बदनामही केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 5:55 PM

पिंपरीच्या त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स स्कुलमधील घटना; पालकांवर गुन्हा दाखल

ठळक मुद्देकाही विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या गेटवर गैरकायद्याची मंडळी जमवून शाळेच्या गेटमधून बेकायदेशीरपणे केला प्रवेश

पिंपरी : शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी आलेल्या पालक व इतरांनी शाळेच्या आयटी कन्सल्टंटला मारहाण करून त्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करत बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स स्कुल येथे सोमवारी (दि. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.

स्टॅफिन फ्रॅन्सिस चेरुवतुर (वय ४०, रा. हडपसर, पुणे) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २५) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रावसाहेब चंद्रकांत थोरात, गणेश सामल, शाळेतील इयत्ता दहावीच्या वर्गातील चार ते पाच विद्यार्थ्यांचे पालक, रावसाहेब थोरात याचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेरुवतुर हे त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स स्कुलचे आयटी कन्सल्टंट आहेत. या शाळेची फी न भरलेल्या काही विद्यार्थ्यांचा शाळा सोडण्याचा दाखला देण्यात यावा, अशी मागणी संबंधित पालकांनी केली होती. याबाबत संबंधित पालकांनी शिक्षणाधिकारी, महापालिका अधिकाऱ्यांना अर्ज दिला होता. दरम्यान, यातील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या गेटवर गैरकायद्याची मंडळी जमवून शाळेच्या गेटमधून बेकायदेशीरपणे प्रवेश केला. आरोपींनी चेरुवतुर यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यातील एकाने घटनेचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करत त्यांची बदनामी केली.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducationशिक्षणCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकPoliceपोलिसArrestअटक