रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 11:57 IST2023-07-16T11:57:34+5:302023-07-16T11:57:47+5:30

दुचाकीचा वेग अतिप्रमाणात असल्याने तरुणाने जीव गमावला

Bike rider dies after hitting a truck parked on the roadside | रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : रस्त्या कडेच्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकली. यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. कुदळवाडी, चिखली येथे गुरुवारी (दि. १३) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.

रसूल रमजान पठाण (वय २१) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ तोसीफ रमजान पठाण (वय २४, रा. हरगुडे वस्ती, चिखली) यांनी शुक्रवारी (दि. १४) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रकच्या अज्ञात चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ रसूल पठाण हे दुचाकीवरून बोऱ्हाडेवस्ती, चिखली येथून त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी कुदळवाडी येथे सेवा रस्त्याच्या कडेला आरोपी चालकाचा ट्रक उभा होता. त्या ट्रकला रसूल पठाण यांची दुचाकी धडकली. यात त्यांच्या दुचाकीचे नुकसान होऊन रसूल पठाण यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Bike rider dies after hitting a truck parked on the roadside