दहावीचा पेपर देऊन आलेल्या विद्यार्थ्याला मारहाण; पिंपरीतील खळबळजनक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 18:25 IST2023-03-16T18:24:59+5:302023-03-16T18:25:08+5:30

आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मारहाण केल्याने विद्यार्थ्याबरोबरच आणखी तिघेही गंभीर जखमी

Beating up the student who came with the 10th class paper; Exciting variety in Pimpri | दहावीचा पेपर देऊन आलेल्या विद्यार्थ्याला मारहाण; पिंपरीतील खळबळजनक प्रकार

दहावीचा पेपर देऊन आलेल्या विद्यार्थ्याला मारहाण; पिंपरीतील खळबळजनक प्रकार

पिंपरी : बोर्डाच्या परीक्षेचा पेपर देऊन आलेल्या विद्यार्थ्यासह तिघांना पूर्ववैमनस्यातून मारहाण केली. तळेगाव दाभाडे येथील एका शाळेच्या गेटसमोर बुधवारी (दि. १५) दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. 

याप्रकरणी एका १७ वर्षीय मुलाने गुरुवारी (दि. १६) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आठ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मित्रासह शाळेच्या गेटसमोर गेले. त्यावेळी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा पेपर देऊन शाळेबाहेर आलेल्या त्यांच्या मित्राला आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मारहाण केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या मित्राला देखील मारहाण केली. यात फिर्यादीसह तिघेही गंभीर जखमी झाले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे तपास करीत आहेत.

Web Title: Beating up the student who came with the 10th class paper; Exciting variety in Pimpri