२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

By रोशन मोरे | Published: November 27, 2023 05:43 PM2023-11-27T17:43:10+5:302023-11-27T17:43:34+5:30

फसवणूक करणारी तरुणी मुळची तामिळनाडूमधील आहे

A 22 year old girl committed a fraud of 2 crores took goods from the company and did not pay | २२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला. मात्र, पैसे न देता कंपनीची फसवणूक केली. ही तरुणी मुळची तामिळनाडूमधील आहे. ही घटना १७ सप्टेंबर २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत पिंपळे गुरव येथील इंटेक्स कंपनीच्या कार्यालयात घडला.

याप्रकरणी विलास बद्रिगिरी गिरी (वय ३६ रा. लोहगाव) यांनी रविवारी (दि.२६) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तामिळनाडू मधील २२ वर्षीय तरुणी, सुगुमार एम (वय. ४४) हरिकृष्णन, टी. कुमारवेल (सर्व रा.तमिळनाडू) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री सत्य साई ट्रेडर्स प्रोप्रायटर फर्मची मालक असणाऱ्या २२ वर्षीय संशयीत तरुणीने श्री सत्य साई ट्रेडर्स पार्टनरशीप फर्म, षन्मुगा इंटरप्रायजेस प्रोप्रायटर, श्रीराम ट्रेडर्स प्रोप्रायटर या विविध फर्म तिच्या व तिच्या नातेवाईकांच्या नावाने स्थापन केल्या. या कंपन्यांची कोणतीही माहिती न देता इंटेक्स कंपनीकडून दोन कोटी १७ लाख २७ हजार ८८ रुपये रुपयांचा माल खरेदी केला. मात्र त्याचे पैसे न देता कंपनीची फसवणूक केली.

Web Title: A 22 year old girl committed a fraud of 2 crores took goods from the company and did not pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.