शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

देहूगावात ३८ घरे जमीनदोस्त

By admin | Updated: October 27, 2015 00:58 IST

येथील देहू-आळंदी रस्त्यावरील लक्ष्मीनगर भागातील महसूल विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागाच्या संयुक्त अतिक्रमणविरोधी कारवाईत ३८ घरांवर हातोडा चालवून जमीनदोस्त करण्यात आले

देहूगाव : येथील देहू-आळंदी रस्त्यावरील लक्ष्मीनगर भागातील महसूल विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागाच्या संयुक्त अतिक्रमणविरोधी कारवाईत ३८ घरांवर हातोडा चालवून जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे देहू-आळंदी रस्त्याने मोकळा श्वास घेतला असुन रुंदीकरण प्रक्रियेस गती मिळणार आहे.कारवाईपूर्वीच रहिवाशांनी घरातील साहित्य व पत्रे काढून सुरक्षित ठिकाणी नेल्याने जास्त नुकसान झाले नाही. अतिक्रमणविरोधी पथकाने तीन जेसीबी, ६ डंपर, ट्रॅक्टर व १५ मजुरांच्या साह्याने ४० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण केली.देहूगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहू-आळंदी रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत विकसित केला जाणार आहे. या रस्त्याचे महापालिका हद्दीतील रुंदीकरण झाले आहे. मात्र, देहू ग्रामपंचायत हद्दीतील काम रखडले आहे. हा रस्ता अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झाला नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, रस्त्याच्या जागेचा ताबा मिळवणे आवश्यक होते. याबाबत महसूल विभागाच्या वतीने कारवाई सुरू आहे. दोन आठवड्यांपूर्वी येथील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांच्या उपस्थितीत बैठख झाली. आळंदी रस्त्याच्या उत्तर बाजूकडील शेतजमिनीचा रस्त्यामुळे झालेला तुकडा व त्यावरील अतिक्रमणामुळे झालेल्या नुकसानीचा पाढाच शेतकऱ्यांनी वाचला होता. त्याची दखल घेत बर्गे यांनी लक्ष्मीनगरमधील रहिवाशांनी दहा दिवसांत बांधकामे स्वत: काढून घ्यावीत अन्यथा कारवाई करू, असे सांगितले होते.सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अप्पर तहसीलदार किरणकुमार काकडे, मंडलाधिकारी सूर्यकांत पाटील, तलाठी मिलिंद मनवर, सचिन मोरे, बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता बापूसाहेब गायकवाड, ग्रामसेवक अर्जुन गुडसुरकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू झाली. ती सायंकाळपर्यंत चालली. उपनिरीक्षक लालासाहेब गव्हाणे व सहकाऱ्यांच्या मदतीने कारवाई झाली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)