शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतकरातून २४३ कोटी

By admin | Updated: October 6, 2016 02:31 IST

महापालिकेच्या करसंकलन विभागाने सप्टेंबरअखेर २४३ कोटी रुपये मिळकतकराची वसुली केली असून, मागील वर्षाच्या तुलनेत १४ कोटींनी अधिक वसुली झाली आहे

पिंपरी : महापालिकेच्या करसंकलन विभागाने सप्टेंबरअखेर २४३ कोटी रुपये मिळकतकराची वसुली केली असून, मागील वर्षाच्या तुलनेत १४ कोटींनी अधिक वसुली झाली आहे, अशी माहिती करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. पहिल्या सहामाहीत मागील वर्षी सप्टेंबरअखेर मिळकतकराची २२८ कोटी वसुली झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी सप्टेंबरअखेर दोन लाख ३३ हजार ३७३ मिळकतधारकांनी २४३ कोटी रुपये मिळकत कराचा भरणा केला असून, ६८ हजार ८९२ मिळकतधारकांनी ६३ कोटी रुपये आॅनलाइन सुविधेचा वापर करून भरणा केला आहे. सोळा करसंकलन विभागीय कार्यालयांपैकी अनुक्रमे मनपा भवन, फुगेवाडी, दापोडी, पिंपरी व निगडी-प्राधिकरण या विभागीय कार्यालयांनी मिळकतकर वसुलीकामी चांगले कामकाज केले आहे. नागरिकांच्या सोईसाठी मिळकतकर भरणा करण्यासाठी वेळ वाढविण्यात येऊन सुटीच्या दिवशी करसंकलन कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)दंडात्मक कारवाई : कर वसुलीसाठी पथकगावडे म्हणाले, ‘‘सप्टेंबरअखेर थकबाकीसह पहिल्या सहामाहीची रक्कम भरणा न केलेल्या मिळकतधारकांना दोन टक्के प्रतिमाह दराने मनपा शास्तीकराची आकारणी करणेत येणार आहे. तसेच डिसेंबरअखेर दुसऱ्या सहामाहीची रक्कम भरणा न केल्यास दुसऱ्या सहामाही रकमेवर ही दोन टक्के प्रतिमाह दराने मनपा कर शास्तीची आकारणी करण्यात येणार आहे. आॅक्टोबरपासून थकबाकी रक्कम रुपये एक लाखावरील सर्व मिळकतधारकांना मागणीपत्र, जप्तीपूर्व नोटीस देऊन मिळकत जप्तीची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. तरी मिळकतधारकांनी थकबाकीसह तत्काळ मिळकतकराचा भरणा करावा. रक्कम रुपये पाच लाखांवरील थकबाकीदारांना नोटीस बजाविणे, मिळकतकर वसुलीकामी मुख्य कार्यालयामार्फत वसुली पथकाची नेमणूक व असमाधानकारक वसुलीचे कामकाज असलेल्या प्रशासन अधिकारी, सहायक मंडलाधिकारी व गटप्रमुख यांना समज पत्र बजाविले आहे.