भूतानमध्ये कमीतकमी खर्चात सुट्टी इन्जॉय करण्याची संधी, IRCTC ने लॉन्ज केलय खास पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 02:08 PM2020-01-08T14:08:13+5:302020-01-08T14:26:11+5:30

हिमालयाच्या कुशीत वसलेला भूतान हा लहानसा देश आहे. भारत आणि चीनच्या मधला अत्यंत सुंदर पर्यटन स्थळं असलेला हा देश आहे.

भूतानचे सौदर्यं पाहण्यासाठी जगभरातून लोक येत असतात. जर तुम्ही सुध्दा कुठेतरी नवीन ठिकाणी भारताबाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर आज आम्ही तुम्हाला भूतानच्या टूर पॅकेजबद्दल सांगणार आहोत. आईआरसीटीसीने हे टूर पॅकेज आणलं आहे.

या पॅकेजचे नाव 'Adbhut Bhutan Ex Delhi’ असं आहे.

या पॅकेजमध्ये पर्यटकांना पारो, थिम्पू आणि पुनाखा या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. या टूरची सुरूवात २५ मार्चला होणार आहे.

आईआरसीटीसी टूरिज्मची आधिकृत वेबसाइट irctctourism.com वर या पॅकेजसंबंधी माहीती देण्यात आली आहे.

जर तुम्हाला या सफरीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला ४७ हजार ४०० रूपये इतका खर्च येणार आहे. तीन जणांना या टूरसाठी ४२ हजार ६०० रूपये इतका खर्च येणार आहे.

यात तुम्हाला पाच रात्री आणि दिवसांचं जेवण आणि नाष्ता मोफत देण्यात येईल. वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी तुम्हाला गाईड केले जाईल.

या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला वेगवेेगळ्या ऐतिहासीक वस्तू सुद्धा पहायला मिळतील. तसंच चहूबाजूंना पसरलेली हिरवळ पाहून मन शांत होतं.