पंजाबमध्ये आढळते धार्मिक विविधता अन् सद्भावना, एकदा आवर्जून भेट द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 14:38 IST2019-04-25T14:30:51+5:302019-04-25T14:38:03+5:30

पंजाब, हरियाणा आणि राजस्थान वेगवेगळी संस्कृती पाहायला मिळते. पंजाब हे तर परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
इथे आपल्याला वेगवेगळ्या वेशभूषेतील लोक दिसतात. या शहरातील अबोहर वन्यजीव अभयारण्यही प्रसिद्ध आहे.
पंजाबला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. या शहराची स्थापना 12व्या शताब्दीत भारत-पाकिस्तानच्या सीमेवर झाली होती.
या शहरातील अबोहर वन्यजीव अभयारण्यही प्रसिद्ध आहे. बिश्नोई समुदायातील लोक या वन्यजीवांचं संरक्षण करतात.
गेल्या काही काळापासून हरण, नीलगाय, साही या लुप्त होणाऱ्या प्रजातींचे हे बिश्नोई समाजातील लोक संरक्षण करतात, तसेच विविध सण वैविध्यतेनं साजरे केले जातात.