जबरदस्त! WhatsApp वर आता 5 नाही तर एकाच वेळी 250 जणांना पाठवता येईल मेसेज; जाणून घ्या, कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 09:02 PM2021-12-04T21:02:58+5:302021-12-04T21:18:48+5:30

WhatsApp News : WhatsApp हे आजच्या युगात संवाद साधण्याचं प्रभावी आणि अत्यंत लोकप्रिय अॅप बनले आहे.

एकमेकांशी संवाद साधण्यासाठी लोक आधी पत्र पाढवायचे. पण आता स्मार्टफोन आल्याने कनेक्ट होणं अगदी सहज शक्य झालं आहे. संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत.

आजकाल WhatsApp , टेलिग्राम, फेसबुक अ‍ॅप्सद्वारे अधिक संभाषण होत आहे. चॅटिंगच्या माध्यमातून संवाद साधला जातो. WhatsApp हे आजच्या युगात संवाद साधण्याचं प्रभावी आणि अत्यंत लोकप्रिय अ‍ॅप बनले आहे. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर होण्यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं.

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा फक्त बोलण्यासाठी केला जात नाही, आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंट देखील करू शकता. व्हिडीओ कॉल, फोटो पाठवणे, गाणी पाठवणे, ग्रुप कॉल असे अनेक फायदे आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात.

व्हॉट्सअॅपवर अनेक सुविधा असल्या तरी तुम्हाला एकाच वेळी अनेकांना व्हिडिओ, फोटो किंवा काहीही पाठवायचे असेल तर ते मात्र अवघड आहे. तुम्ही एकाच वेळी फक्त पाच लोकांना अटॅचमेंट किंवा मेसेज पाठवू शकता.

जर तुम्हाला त्याच गोष्टी पुन्हा कुणाला पाठवायच्या असतील तर पुन्हा-पुन्हा Contacts निवडावे लागतात. जर तुम्हीही अशा समस्येने त्रस्त असाल तर जाणून घ्या व्हॉट्सअॅपच्या या खास ट्रिकबद्दल. यामुळळे एकाच वेळी तब्बल 250 जणांना मेसेज पाठवणं शक्य होणार आहे.

सर्वप्रथम तुमचा स्मार्टफोन घ्या. त्यानंतर तुमचे WhatsApp ओपन करा. आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहा, उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्स दिसतील. त्या तीन डॉट्स च्या पर्यायावर क्लिक करा.

आता New Group, New Broadcast, Linked Device, Starred Message, Payment आणि Settings चा पर्याय दिसेल. यानंतर New Broadcast च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले सर्व नंबर स्क्रीनवर दिसतील.

आता ज्या व्यक्तीला काहीही पाठवायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा. यामध्ये तुम्ही 250 लोकांपर्यंतचे नंबर निवडू शकता. त्यानंतर उजवीकडे एक चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा. असं केल्यानंतर 250 जणांचा ग्रुप तयार होईल. या ग्रुपमध्ये कोणताही व्हिडिओ, फोटो आणि मेसेज एकत्र पाठवता येईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये व्हॉट्सअ‍ॅप काही धमाकेदार फीचर्स आणणार आहे. तर काही फीचर्ससाठी अपडेट जारी करणार आहे. यामध्ये आता इन्शुरन्सचाही समावेश असणार आहे. इन्शुरन्ससह अनेक कामं करता येणार आहेत.

फेसबुकच्या मालकीच्या WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी तीन नवीन फीचर्स लाँच केले आहेत. युजर्सला कमालीचा चॅटिंग एक्सपीरियन्स देण्यासाठी कंपनी अ‍ॅपमध्ये नेहमीच नवीन अपडेट आणत असते. इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तीन नवीन दमदार फीचर्स आणले आहे. ज्यामधील दोन व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप आणि एक व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी आहे.