WhatsApp वर आलं नवं फीचर, मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला हे समजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:37 PM2019-04-01T15:37:19+5:302019-04-01T15:52:33+5:30

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा आणली होती. मात्र आता त्यामध्ये बदल करत व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर आणलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमध्ये 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील फॉरवर्डिंग इन्फोमुळं मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे याची माहिती मिळणार आहे.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने हे नवे फीचर iOS आणि अ‍ॅन्ड्रॉईडच्या बीटा व्हर्जनवर लाँच केले आहे. iOS बीटा 2.19.40.23 आणि Android बीटा 2.19.86 व्हर्जनवर हे अपडेट दिसणार आहे.

'Forwarding Info' हा पर्याय युजर्सना मेसेज इन्फो सेक्शनमध्ये दिसणार आहे. कोणता मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला आहे हे यामुळे पाहता येईल. मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला आहे हे पाहण्यासाठी तो आधी तुम्ही फॉरवर्ड केला पाहिजे. फॉरवर्ड केल्यानंतर जर तुम्ही मेसेज इन्फो चेक केली तर तर तुम्हाला मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे याची माहिती मिळेल.

'Frequently Forwarded' हा पर्याय सुद्धा दिसणार आहे. यामध्ये चार पेक्षा जास्तवेळा फॉरवर्ड केलेल्या मेसेज दिसणार आहे. सध्या याचे बीटा व्हर्जन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जर एखादा मेसेज Frequently Forwarded या टॅगसह आला असेल तर तो मेसेज कमीतकमी 4 वेळा फॉरवर्ड केलेला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचं 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' हे नवीन फीचर कधीपासून येणार याबाबत व्हॉट्सअ‍ॅपने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच युजर्ससाठी हे फीचर लाँच केलं जाणार आहे.

WhatsApp चा वापर हा केवळ इंग्रजी नाही तर स्थानिक भाषेतही करता येतो. WhatsApp हे 10 स्थानिक भाषांना सपोर्ट करतं. WhatsApp हिंदी, मराठी, तमिळ, पंजाबी, बंगाली, उर्दू, गुजराती, मल्ल्याळम भाषांसह अन्य काही भाषांना सपोर्ट करतं.