WhatsApp वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे? 'या' युजर्ससाठी सब्सक्रिप्शन मॉडेलची टेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 01:44 PM2022-05-18T13:44:04+5:302022-05-18T13:51:09+5:30

WhatsApp : हे सब्सक्रिप्शन मॉडेल WhatsApp Business साठी टेस्ट केले जात आहे.

WhatsApp एका सब्सक्रिप्शन-बेस्ड मॉडेलवर काम करत आहे. यामुळे युजर्सला अनेक फीचर्स वापरण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. मात्र, हे सर्व युजर्ससाठी नसणार आहे. हे सब्सक्रिप्शन मॉडेल WhatsApp Business साठी टेस्ट केले जात आहे.

एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, WhatsApp Business प्रोफाइल ऑनर WhatsApp Premium मुळे ऑप्ट आऊट सुद्धा करता येते आणि सध्याच्या व्हर्जनला सतत वापरता येऊ शकते. सब्सक्रिप्शन मॉडेल संदर्भात सर्वात पहिल्यांदा एप्रिलमध्ये रिपोर्ट आला होता.

या रिपोर्टमध्ये म्हटले होते की, प्लॅन घेतल्यानंतर WhatsApp Business युजर्स डिव्हाइसला 10 डिव्हाइसपर्यंत लिंक अप करता येऊ शकते. आता पुन्हा एकदा यामध्ये झालेल्या डेव्हलपमेंटवरून WhatsApp च्या नवीन फीचर्सबाबत माहिती देणारी वेबसाइट WABetainfo ने रिपोर्ट केला आहे.

याचबरोबर, WhatsApp Premium ला अँड्राइड, डेस्कटॉप आणि iOS साठी टेस्ट केली जात आहे. हे फीचर फक्त बिझनेस अकाउंटसाठी असेल आणि हा पर्यायी असेल. म्हणजेच युजर्सवर अवलंबून असेल की, ते सब्सक्रिप्शन घेऊ शकतात की नाही, असेही रिपोर्टमध्ये म्हटले होते.

सब्सक्रिप्शन प्लॅनच्या डिटेल्स संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, सब्सक्रिप्शन घेतल्यानंतर WhatsApp Business यूजर्सला अॅडिशनल फीचर्स दिले जातील. यामध्ये एक फीचर 10 डिव्हाइसपर्यंत लिंक अप करण्याचे सुद्धा असू शकते.

आता युजर्स मल्टी डिव्हाइस फीचरमुळे 4 डिव्हाइसला लिंक करु शकतात. याशिवाय, सब्सक्रिप्शन घेतल्यानंतर WhatsApp Business युजर्सला युनिक कस्टम बिझनेस लिंक क्रिएट करण्याची सुविधा दिली जाऊ शकते.

दरम्यान, आताही WhatsApp Business युजर्स शॉर्ट लिंक क्रिएट करु शकतात, ज्यामुळे कस्टमर्स त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करु शकतात. सध्या आपल्याला या फीचर्सबाबत अधिकृत माहितीसाठी अजून थोडी वाट पाहावी लागेल.