तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp वर पाठवलेले मेसेज आता करता येणार एडिट; कंपनीची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 08:56 AM2023-05-23T08:56:35+5:302023-05-23T09:05:35+5:30

WhatsApp : लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp मध्ये आता मेसेज एडिट करता येणार आहे.

WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं म्हणून WhatsApp सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp मुळे युजर्सला देखील अनेक गोष्टी सोप्या होतात. आता आणखी एक असंच भन्नाट फीचर आलं आहे.

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग एप WhatsApp मध्ये आता मेसेज एडिट करता येणार आहे. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. फेसबुक पोस्टमध्ये झुकेरबर्गने लिहिलं आहे की, युजर्स आता पाठवलेले WhatsApp मेसेज एडिट करू शकतील.

मार्क झुकरबर्गने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'आता तुम्ही 15 मिनिटांसाठी WhatsApp वर पाठवलेले मेसेज एडिट करू शकणार आहात'. WhatsApp मेसेज एडिट करण्यासाठी, पाठवलेला मेसेज प्रेस एंड होल्ड ठेवावा लागेल.

मेसेज प्रेस एंड होल्ड केल्यानंतर एडिटचा पर्याय दिसेल जिथून तुम्ही मेसेज एडिट करू शकता. तसेच एडिटेड मेसेजसाठी Edited चा टॅग केला जाईल. म्हणजेच ज्या व्यक्तीला मेसेज एडिट करून तो मेसेज पाठवला आहे. त्याला तो एडिट केल्याचं समजेल.

विशेष म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुम्ही आधी कोणता मेसेज पाठवला होता जो आता एडिट केला गेला आहे हे कळणार नाही. जसं पूर्वीचं ट्विट एडिट ट्विटमध्ये दिसत होतं, तसं WhatsApp मध्ये होणार नाही, इथे एडिट हिस्ट्री दिसणार नाही, फक्त एडिट केलेला टॅग दिसेल.

कंपनीने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटलं आहे की, आता युजर्सचं चॅटिंग दरम्यान यामुळे अधिक कंट्रोल असेल आणि जर मेसेजमध्ये काही चूक झाली असेल तर ती 15 मिनिटांत एडिट करता येईल.

आतापर्यंत WhatsApp अनसेंड फीचर होतं, पण एडिट करण्याचा पर्याय नव्हता. सध्या WhatsApp वर पाठवलेला मेसेज 60 तासांसाठी मागे घेता येतो. खरं तरं हे फीचर काही नवीन नाही.

WhatsApp चा प्रतिस्पर्धी टेलिग्राममध्ये खूप पूर्वीच मेसेज एडिट करण्याची सुविधा आहे. याशिवाय सिग्नलमध्येही हे फीचर आधीपासूनच आहे. तसेच मेसेज सेंड केल्यानंतर एडिट करण्यासाठी वेळेचं लिमिट देखील नाही.

मेटाने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर सर्व युजर्ससाठी जारी करण्यात येत आहे. मात्र हे फीचर प्रत्येक युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी एक आठवडा लागेल. तुम्ही App अपडेट करून देखील तपासू शकता, जर हे फीचर येत नसेल तर काही दिवस थांबा, हे फीचर iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

WhatsApp वर आपल्याला एंड-टू-एंड एन्क्रिप्शन मिळतं. मात्र यानंतरही कोणाच्या हातात जर आपला अनलॉक फोन लागला तर तो चॅट्स एक्सेस करू शकत होता, पण आता असं होणार नाही. अशा परिस्थितीसाठी कंपनीने प्लॅटफॉर्मवर एक नवीन सिक्यारोटी फीचर जोडलं आहे. त्याच्या मदतीने चॅट लॉक करू शकता.

WhatsApp चॅट लॉकचे फीचर सर्व युजर्ससाठी आणले गेले आहे. त्याच्या मदतीने, युजर्स ग्रूप किंवा वैयक्तिक चॅट लॉक करू शकतात. या फीचरनंतर, फक्त तुम्ही तुमच्या चॅट्समध्ये प्रवेश करू शकाल. यासाठी तुम्हाला डिव्हाईस पिन किंवा बायोमेट्रिक्स लॉक वापरावे लागेल.

हे फीचर फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस लॉकसह देखील कार्य करते. म्हणजेच, जर तुम्ही चॅट लॉक केले असेल तर ते उघडण्यासाठी तुम्हाला पिन, फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकचा वापर करावा लागेल. तुम्ही चॅट लॉक करताच, WhatsApp त्या संभाषणातील मजकूर चॅट नोटीफिकेशनमध्ये लपवतं.