तंत्रज्ञानाची किमया! Whatsapp वर आलं कमाल फीचर; एकाचवेळी जोडले जाणार 1000 हून अधिक लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 12:10 PM2022-10-11T12:10:52+5:302022-10-11T12:20:21+5:30

WhatsApp : ग्रुप मेंबर्सची संख्या पुन्हा एकदा वाढवली जाऊ शकते. आधीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट होणार आहे.

मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर लागोपाठ नवीन फीचर्सचा फायदा युजर्सना मिळत आहे. आता याच्या ग्रुप मेसेजिंग सिस्टमध्ये मोठा बदल केला जात आहे. आधी एकाच ग्रुपमध्ये फक्त 256 मेंबर्सचा समावेश केला जाऊ शकत होता. आता जास्त संख्या वाढवून 512 करण्यात आली आहे.

नवीन रिपोर्टवरून संकेत मिळत आहेत की, ग्रुप मेंबर्सची संख्या पुन्हा एकदा वाढवली जाऊ शकते. आधीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट होणार आहे. अन्य मेसेजिंग ॲप्सच्या तुलनेत व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये कमी मेंबर्सचा समावेश केला जाऊ शकत होता. परंतु, नवीन बदलानंतर हे अंतर संपणार आहे.

व्हॉट्सॲपच्या एका ग्रुपमध्ये 1024 मेंबर्स जोडले जाऊ शकतात. या नवीन लिमिटची टेस्टिंग केली जात आहे. याप्रमाणे एकाचवेळी हजारांहून जास्त लोकांपर्यंत पोहोचले जाऊ शकते. तसेच युजर्ससाठी ग्रुप मेसेजिंगचा एक्सपीरियन्स आणखी चांगला होणार आहे.

व्हॉट्सॲपअपडेट्सची माहिती देणारा प्लॅटफॉर्म WABetaInfo च्या माहितीनुसार, मेटाच्या ओनरशीपचे ॲप सध्या 512 पार्टीसिपेंट्सच्या ग्रुप लिमिट्समध्ये बदलाची टेस्टिंग केली जात आहे. आता ॲडमिन्सला एका ग्रुपमध्ये 1024 पर्यंत मेंबर्सचा समावेश करण्याचा ऑप्शन दिला जात आहे.

हे फीचर बीटा युजर्ससोबत टेस्ट केले जात आहे. तसेच निवडक बीटा युजर्सला या फीचरचा फायदा मिळत आहे. प्रायव्हसी देताना व्हॉट्सॲपने आपल्या व्ह्यू वन्स फीचर मध्ये बदल केला आहे. आतापर्यंत व्ह्यू वन्स फीचर सोबत पाठवण्यात आलेले फोटोज किंवा व्हिडिओजच्या स्क्रीनशॉट्ससाठी पाठवले जात होते.

आता युजर्स कोणत्याही व्ह्यू वन्स मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. हा ऑप्शन मिळणे बंद झाला आहे. अनेक अडवॉन्स्ड फीचरचा फायदा निवडक युजर्सला देताना व्हॉट्सॲप बिझनेस युजर्ससाठी एक प्रीमियम सेवेचा टेस्टिंग केली जात आहे. प्रीमियम सब्सक्रिप्शन सेवेचा फायदा व्हॉट्सॲपवर छोट्या मोठ्या बिझनेसमॅनला होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.