Twitter ने लाँच केले Super Follows फीचर; 'इतके' फॉलोव्हर्स असणारे युजर्स कमवू शकतात पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 01:22 PM2021-09-02T13:22:26+5:302021-09-02T13:31:37+5:30

Twitter : या सुपर फॉलोज फीचरमुळे कंपनी युजर्सला पैसे कमविण्याची संधी देत आहे.

ट्विटरने (Twitter) सुपर फॉलोज (Super Follows) फीचर लाँच केले आहे. या फीचर्सपासून युजर्स सब्सक्राइबर फक्त कंटेंटसाठी पैसे घेऊ शकतात. बुधवारी कंपनीकडून हे फीचर जारी करण्यात आले.

या फीचरमुळे कंपनी युजर्सला पैसे कमविण्याची संधी देत आहे. Super Follows फिचरचा अॅक्सेस मर्यादित आहे. Super Follows ला सर्वजण सेटअप करू शकत नाहीत. या फीचरला अॅक्सेस करण्यासाठी युजर्सजवळ किमान 10,000 फॉलोअर्स असणे आवश्यक आहे.

यामध्ये युजर्स सबस्क्रिप्शन चार्ज 2.99 डॉलर, 4.99 डॉलर .99 डॉलरवर सेट करू शकतात. याचा वापर करण्यासाठी 30 दिवसांत कमीत कमी 25 ट्विट असले पाहिजेत. हे सध्या आयओएस युजर्ससाठी मर्यादित आहे. हे सध्या अमेरिका आणि कॅनडामध्ये उपलब्ध आहे.

या फीचरद्वारे सब्सक्राइब्ड युजर्सला तुम्ही एक्सक्लुझिव्ह कंटेंट देऊ शकता. हे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला Twitter iOS अॅपवर मेनू ओपन करावे लागेल. यामध्ये तळाशी आपल्याला मॉनिटाइजेशनचा पर्याय मिळेल. त्यानंतर तुम्हाला सुपर फॉलोजचा पर्याय दिसेल.

या सुपर फॉलोजवर तुम्हाला टॅप करावे लागेल. त्यानंतर येथे तुम्हाला एलिजिबिलिटी चेक करावी लागेल. जर तुम्ही या फीचरसाठी क्वालिफाय (पात्र) असाल, तर तुम्हाला अप्लाय बटणवर क्लिक करावे लागेल.

यात तुम्ही 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहात का, हे व्हेरिफाय करावे लागेल. यासाठी तुम्हाला प्रोफाइल कंप्लीट करुन टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला आर्ट, कॉमेडी यांसारखी कंटेंट कॅटगरी सिलेक्ट करावी लागेल.

फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अॅप्लिकेशन सबमिट करायचे आहे. दरम्यान, अॅप्लिकेशन सबमिट केल्यानंतर युजर्सला अप्रूव्हलसाठी किती प्रतीक्षा करावी लागेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हे फीचर लवकरच इतर देशांमध्ये जारी केले जाईल, असे म्हटले जात आहे.

Read in English