पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव

By योगेश पांडे | Published: May 7, 2024 11:36 PM2024-05-07T23:36:47+5:302024-05-07T23:37:34+5:30

क्षुल्लक वादातून घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Husband took extreme decision after wife served cold vegetables, bit marshals saved life | पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव

पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पत्नीने थंड भाजी दिल्याने संतापलेल्या पतीने वाद घालत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पतीने घराबाहेर काढलेल्या महिलेने पोलिसांना माहिती दिल्यावर वेळेत आलेल्या बिट मार्शल्समुळे ओढणीला लटकलेल्या पतीचा जीव वाचला. क्षुल्लक वादातून घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

रात्री साडेआठच्या सुमारास ठक्करग्राम परिसरात गस्तीवर असताना बिट मार्शल्सना एका महिलेचा पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या फोनचा संदेश प्राप्त झाला. लष्करीबाग परिसरात एका महिला व तिच्या मुलाला दारूच्या नशेत पतीने मारहाण केली व दोघांनाही घराबाहेर काढले. पतीने दरवाजा आतून बंद केला होता. बिट मार्शल्स अतुल व मनोज यांनी तातडीने प्रभारी ठाणेदारांना घटनेची माहिती दिली. बाबुराव राऊत यांनी तेथे तातडीने प्रफुल्ल व देवेंद्र यांनादेखील पाठविले. चौघेही बिट मार्शल्सला शंका आल्याने त्यांनी लगेच दरवाजा तोडला. घरात अंधार असल्याने त्यांनी मोबाईल टॉर्चमध्ये पाहणी केली असता महिलेचा पती पंख्याला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. प्रफुल्ल व देवेंद्र यांनी धाव घेत त्याचे पाय पकडले तर अतुलने स्टूल घेऊन ओढणी सोडविली. या प्रकाराने हादरलेल्या पतीला त्यांनी शांत केले. पत्नीने गरम भाजी न देता थंड भाजी दिल्याने संतापात हे पाऊल उचलल्याचे पतीने सांगितले. पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी चारही बिट मार्शल्सना कार्यालयात बोलावून त्यांना सन्मानित केले.

Web Title: Husband took extreme decision after wife served cold vegetables, bit marshals saved life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.