पुन्हा लाँच होणार का PUBG Mobile India?; मेकर्सकडून हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:21 PM2021-03-22T17:21:59+5:302021-03-22T17:27:11+5:30

PUBG : काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारनं या गेमवर आणली होती बंदी

भारतात PUBG या गेमची तरूणांमध्ये मोठी क्रेझ होती आणि आहेदेखील. PUBG हा अनेकांच्या पसंतीचा गेम होता. काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव या गेमवरही बंदी घालण्यात आली होती.

परंतु आता PUBG Mobile India या गेम लाँचची वाट पाहणाऱ्यांसाठी ही बातमी एक चांगली बातमी ठरू शकते.

PUBG च्या मेकर्सनं जॉब सर्च आणि इन्फॉर्मेशन साईट LinkedIn वर Investment and Strategy Analyst नावाच्या पोस्टच्या हायरिंगसाठी जॉब लिस्टिंग टाकली आहे.

अशातच या गेमचं भारतीय व्हर्जन लवकरच लाँच होण्याची शक्यता असल्याचे अंदाज बांधले जात आहे. तसंच कंपनीनं विस्ताराचीही योजना आखली असून यासाठी वेकंन्सीची लिस्टिंग टाकल्याचंही म्हटलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी PUBG च्या मेकर्सनं PUBG Mobile India लाँच करण्यासाठी सरकारसोबत चर्चा सुरू असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लवकरच या दिशेनं काही स्पष्ट निर्णय येण्याची शक्यताही आहे.

भारतात PUBG या गेमचा चाहता वर्ग फार मोठा आहे आणि हा गेम पुन्हा लाँच कधी होईल या प्रतीक्षेतही अनेकजण आहेत. परंतु अद्याप भारत सरकारनं याला परवानगी दिलेली नाही.

काही महिन्यांपूर्वी सरकारच्या संबंधिक मंत्रालयानं माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीमध्ये हा गेम पुन्हा लाँच करण्यासाठी कोणतीही सवलत दिली नसल्याचं म्हटलं होतं.

परंतु दुसरीकडे PUBG ची टीम हा मेग भारतात लाँच करण्यासाठी तयारी करत आहे. दरम्यान, आता नव्या लोकांना टीममध्ये घेत असल्यानं पुन्हा हा गेम लाँच होणार का अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव २०० पेक्षा अधिक चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये PUBG, टिकटॉकसारख्या लोकप्रिय अॅप्सचाही समावेश होता.

सध्या मेकर्स PUBG Mobile India हा गेम लाँच करण्याच्या प्रयत्नात असल्याचं म्हटलं जात आहे. हा गेम PUBG चं भारतीय व्हर्जन असेल.

Read in English